कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर अपघातामध्ये एक गंभीर जखमी

अमर पाटील
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

बांबवडे - कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर गोगवे येथे टेम्पो व ट्रकची समोरासमोरील धडक झाली. या अपघातामध्ये टेम्पो चालक राजेंद्र भिमराव चिले (वय ४१, रा पैजारवाडी ता. पन्हाळा) हा गंभीर जखमी झाला आहे. 

बांबवडे - कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर गोगवे येथे टेम्पो व ट्रकची समोरासमोरील धडक झाली. या अपघातामध्ये टेम्पो चालक राजेंद्र भिमराव चिले (वय ४१, रा पैजारवाडी ता. पन्हाळा) हा गंभीर जखमी झाला आहे. ट्रक चालक महम्मद रफीक हुन्नरी (वय ३४, रा शहाबाद ता. चित्तापुर  जि. गुलबर्गी कर्नाटक) हा किरकोळ जखमी झाला. दोघांनाही खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

याबाबत माहिती अशी की, टेम्पो चालक (एम. एच.०८ एच १६६८) राजेंद्र भिमराव चिले हा कोल्हापूरहुन किराणा माल घेऊन रत्नागिरीला निघाला होता. तर ट्रक चालक (के. ए. ३२ सी ९५३९) महम्मद जिन्नदी हा बाॅक्साईड भरून कोल्हापूरला जात होता. आज पहाटे साडेचारच्या सुमारास गोगवे येथील वळणावर ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रक शेजारून जाणाऱ्या टेम्पोवर आदळला. या अपघातामध्ये गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: kolhapur news accident near Gogave