मी त्याला जाऊच दिले नसते.... - मृत "केतन'च्या आईची व्यथा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - त्याची स्वप्ने मोठे होती ओ.. तो पन्हाळ्याला जाणार म्हणून सांगितले असते तर मी नकोच म्हटले असते. तासगाव (जि. सांगली) मधील माधवी प्रदीप खोचे सांगत होत्या. अपघाताची माहिती मिळाल्यावर त्या सीपीआरमध्ये आल्या. त्यांचा मुलगा मयत झाला हे त्यांना सांगितले नव्हते. उपचार सुरू असल्याचे सांगून सीपीआरमध्ये बाहेर बसविले, तेंव्हा "सकाळ'शी बोलत होत्या. 

केतन खोचे हा वॉलचंद महाविद्यालयाचा विद्यार्थी. वडिल प्रदीप सहाय्यक फौजदार आहेत. काल शिवजयंती निमित्त रात्रभर ड्युटीवर होते. पहाटे त्यांच्या मुलग्याचा अपघात झाल्याची माहिती त्यांच्याच गावचे आणि सध्या शाहूवाडी पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी त्यांना दिली. ते ड्युटीवरून सीपीआरमध्ये आले. त्यांची पत्नी माधवी, केतनचा लहान भाऊ आणि बहीण सीपीआरमध्ये आले. मुलगा केतन जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असेच आई माधवी यांना सांगितले होते. त्यामुळे त्या पाय जाऊ दे, हात जाऊ दे, काहीही होऊ दे.. त्याला आपल्या घरी गावी घेवून जाऊ या. येथून हलवा असे त्या सांगत होत्या. 

काल त्याने घरी फोन करून मी शिवजयंतीच्या कार्यक्रमात आहे, म्हणून सांगितले होते, पण त्याने पन्हाळ्याला जाणार म्हणून सांगितले असते तर मी जाऊच दिले नसते. आता तो कसाही असू दे घरी घेवून जाणार असेही त्यांनी सांगितले. याचवेळी केतन मयत झाला आहे, याची माहिती असलेल्या नातेवाईकांच्यात डोळ्यातील आश्रू आवरते घेत त्यांना सावरत होते. 

केतन सध्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात होता. इंजिनिअर होणार म्हणून घरातही आनंदाचे वातावरण होते. आज अचानक अपघातात केतनाचा मृत्यू झाला आणि केतनच्या स्वप्नाबरोबरच कुटुंबियांची स्वप्ने धुळीस मिळाली. 

संबंधीत बातम्या

Web Title: Kolhapur News accident near Nagaon Phata