उत्तूरजवळ ट्रकची मोटारीला धडक, एअरबॅगमुळे दोघे बचावले

अशोक तोरस्कर
गुरुवार, 19 जुलै 2018

उत्तूर - आजारा मार्गावर आंबेओहळ पुलाजवळ ट्रकची मोटारीला धडक बसली. या अपघातामध्ये मोटार व ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

उत्तूर - आजारा मार्गावर आंबेओहळ पुलाजवळ ट्रकची मोटारीला धडक बसली. मोटारीत एअरबॅग असल्याने मोटारीतील दोघेही सुदैवाने वाचले. या अपघातामध्ये मोटार व ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

धडक झाल्यावर मोटारीमधील एअरबॅग उघडली. त्यामुळे मोटारीमधील दोघेजण सुदैवाने बचावले. सकाळी अकरा वाजता हा अपघात घडला. अपघाताची नोंद पोलीसात झाली आहे. धीरज प्रभाकर डोईफोडे (वय ३९,रा.१०५.साबणे रोड, महाबळेश्वर, जि. सातारा) हे  दुध व्यावसायिक  मोटारीने  (नंबर MH- 11 -CG-5225 ) कोकणात जात होते. यावेळी आजराहून आलेल्या नजीर मज्जीद माणगावकर (रा.आजरा ) यांच्या ट्रकची ( नंबर MH-O9-EM-) धडक बसली. 

Web Title: Kolhapur News accident near Uttur