शिवशाही बसला अपघात; १३ जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

गोकुळ शिरगाव - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल गारवाच्या समोर एसटी महामंडळाची शिवशाही बस कठड्याला धडकल्याने १३ प्रवासी जखमी झाले. अपघातात बसचे मोठे नुकसान झाले. जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. अपघातामुळे महामार्गावर पाऊण तास कोंडी 
झाली होती.

चंदगड आगाराची चंदगड-बोरिवली शिवशाही एसटी बस कोल्हापूरच्या दिशेने सुसाट येत होती. हॉटेल गारवा येथे बस आली असताना चालकाचा गाडीवरचा अचानक ताबा सुटल्याने बसने सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला जोराची धडक दिली. बसमध्ये २३ प्रवासी होते. काहींच्या डोक्‍याला जबरदस्त मार लागला; तर अनेकांची तोंडं शीटजवळच्या लोखंडी गजला लागून  रक्तबंबाळ झाली. घटनेची माहिती समजताच १०८ च्या चार रुग्णवाहिका  घटनास्थळी दाखल झाल्या व  जखमींना तातडीने  उपचारांसाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींची नावे अशी - प्रथमेश गंगाराम वेसणे (वय १७), दीपाली दिलीप पिळणकर (३०), दिलीप लक्ष्मण पिळणकर (५५, रा. चंदगड), रोहन श्रीकांत मूर्ती (२६, रा. गडहिंग्लज), श्रद्धा तानाजी कोकीतकर (२३, रा. मुंबई), विष्णू बाबू रेडेकर (४९), पद्मा विष्णू रेडेकर (४९, दोघे रा. चंदगड), तनाजी आप्पा कोकीतकर (५८, रा. मुंबई), राणी रामचंद्र सूर्यवंशी (३२, रा. उचगाव, करवीर), प्रसाद धनाजी अर्दाळकर (२७, रा. ठाणे), सुरेश शंकर रेडेकर (५२, रा. मुंबई), सुनीता तानाजी कोकीतकर (४३, रा. गडहिंग्लज), चालक अतुल जगताप (रा. माहूर).

Web Title: Kolhapur News accident to Shivshahi Bus