कोल्हापूर: वाघबीळ दरीत मोटार कोसळली; एक ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

वाघबीळ घाटातून जात असताना हजारे यांचा मोटारीवरील ताबा सुटला. तशी मोटार सुमारे 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली. त्यात उमेश कनटगे हे मयत झाले. तर हजारे व पवार हे दोघे जखमी झाले. घटनेची माहिती पहाटेच्या सुमारास कोडोली पोलिस ठाण्याला समजली.

कोल्हापूर : वाघबीळ (ता. पन्हाळा) दरीत मध्यरात्री आलीशान मोटार कोसळली. त्यात एक जण ठार तर दोघे जण जखमी झाले. उमेश सुभाष कनटगे (रा. कागवाड, ता. अथणी, जि. बेळगाव) असे मयताचे नाव आहे. घटनास्थळी कोडोली पोलिसांनी धाव घेत मदतकार्यास सुरवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. 

प्रतिम जयपाल हजारे (वय 34, रा. विजयनगर, सांगली) आणि ओंकार अशोक पवार (रा. खणबाग, सांगली) अशी जखमींची नावे आहेत. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की मध्यरात्री दोनच्या सुमारास प्रितम हजारे हे आलीशान मोटारीतून (एमएच-10-बीएम-0079) कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावरून जात होते. त्यांच्या मोटारीत ओंकार पवार आणि उमेश कनटगे हे दोघे होते. वाघबीळ घाटातून जात असताना हजारे यांचा मोटारीवरील ताबा सुटला. तशी मोटार सुमारे 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली. त्यात उमेश कनटगे हे मयत झाले. तर हजारे व पवार हे दोघे जखमी झाले. घटनेची माहिती पहाटेच्या सुमारास कोडोली पोलिस ठाण्याला समजली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन आपत्तीव्यवस्थापनाच्या मदतीने मदत कार्यास सुरवात केली. जखमींना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले. दुपार पर्यंत मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू होते. या परिसरात गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी घटना ठरली. 

Web Title: Kolhapur news accident in waghbil ghat one dead