प्रा. डॉ. नलगे यांना ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार

गुरुवार, 17 मे 2018

कोल्हापूर - यंदाचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार प्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर झाला आहे. १३ जूनला सासवड येथे पुरस्काराचे वितरण होईल.

कोल्हापूर - यंदाचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार प्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर झाला आहे. १३ जूनला सासवड येथे पुरस्काराचे वितरण होईल.

गेली २८ वर्षे हा पुरस्कार अनेक नामवंत साहित्यिकांना देण्यात आला आहे. डॉ. नलगे यांना आजवर ६४ पुरस्कार मिळाले असून, त्यांची ८६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र शासनाचे १३ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांनी लिहिलेली ‘रातवा’, ‘आणखी एक जन्म’ ही आत्मचरित्रे मराठीत श्रेष्ठ आत्मचरित्रे मानली जातात. त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने त्यांना डी.लिट्‌. पदवीने सन्मानित केले आहे.