मसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

कोल्हापूर - शाहूपुरीतील पाच बंगला परिसरातील मंजुळा इमारतीतील ‘गुलमोहर फिटनेस सेंटर’ या मसाज सेंटरमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेस पोलिसांनी काल रात्री अटक केली. प्रिया विनायक यादव (वय २७ रा. पुईखडी, शिव-पार्वती हौसिंग सोसायटी, कोल्हापूर) असे मालकिणीचे नाव आहे. तिच्या ताब्यातील दोन पीडित महिलांची सुटका केली.

पोलिसांनी सांगितले, ‘गुलमोहर फिटनेस सेंटर’ आहे. या मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला मिळाली. उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी काल सायंकाळी तेथे बनावट ग्राहक पाठविला. तेथे मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याचे समजताच त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक आरती नांद्रेकर यांच्यासह तेथे छापा टाकला. सेंटरची मालकीण प्रिया यादव हिला अटक केली. तिच्याकडे असलेल्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन महिला सुधारगृहात त्यांची रवानगी केली.

Web Title: Kolhapur News action on Gulmohar Fitness center