थकीत कर्जापोटी दोन शिवशाही बस आणल्या ओढून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

कोल्हापूर - गुजरातमधील रॅन्बो कंपनी चालवत असलेल्या शिवशाही बसगाड्यांच्या कर्जाचे हप्ते थकीत आहेत. त्यामुळे रत्नागिरी मार्गावरील दोन शिवशाही गाड्या खासगी वित्त कंपनीने ओढून आणल्या. त्या बस कोल्हापुरात लावल्या आहेत. यातून शिवशाही चालविण्यास घेणाऱ्या ठेकेदारांचे आर्थिक गणित फसल्याचे उघड होत आहे. 

कोल्हापूर - गुजरातमधील रॅन्बो कंपनी चालवत असलेल्या शिवशाही बसगाड्यांच्या कर्जाचे हप्ते थकीत आहेत. त्यामुळे रत्नागिरी मार्गावरील दोन शिवशाही गाड्या खासगी वित्त कंपनीने ओढून आणल्या. त्या बस कोल्हापुरात लावल्या आहेत. यातून शिवशाही चालविण्यास घेणाऱ्या ठेकेदारांचे आर्थिक गणित फसल्याचे उघड होत आहे. 

महामंडळाने स्वतःच्या ५००, तर १५०० गाड्या कंत्राटी तत्त्वावर घेतल्या आहेत. खासगी टुर्स ठेकेदारांकडून ज्या गाड्या घेतल्या, 
त्यातून राज्यभरात बहुतांशी ठिकाणी नियमित वाहतूक सुरू आहे; मात्र गुजरातमधील एकमेव ठेकेदाराच्या गाडीचे कर्जाचे हप्ते थकल्याने खासगी कंपनीने गाड्या ओढून नेण्याचा प्रसंग उद्‌भवला आहे.

गुजरातमधील रेन्बो कंपनीच्या ठेकेदारांच्या दहा गाड्या आहेत. त्यातील काही गाड्या अकोला, लातूर, रत्नागिरी मार्गावर चालवल्या जातात. उर्वरित गाड्या मुंबई मार्गावर धावतात. एक गाडी ३६ ते ४० लाखांची आहे. त्यासाठी या कंपनीने वित्त कंपनीकडून कर्ज घेऊन या गाड्या महामंडळाकडे भाडेतत्त्वावर लावल्या होत्या. सहा महिन्यांत काही लाखांचे कर्जाचे हप्ते थकल्याने वित्त कंपनीने गाड्या ओढून आणल्याचे सूत्रांनी सांगितले. 

गाड्यांची स्थिती गंभीर
रेन्बो कंपनीच्या ओढून आणलेल्या गाड्यांची चाके जुनी झाली आहेत. ताराही बाहेर आल्या आहेत. अशा ५० आसन क्षमतेची गाडी दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात ७० पेक्षा अधिक वेगाने चालविणे मुश्‍कील होते. तरीही काही महिने या गाडीतून प्रवासी वाहतूक सुरू होती.

एस.टी. महामंडळाला फटका 
एस.टी. व खासगी शिवशाही बस चालविणाऱ्या कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार एस.टी. महामंडळाला रोज ३०० किलोमीटरप्रमाणे कंत्राटदाराला पैसे द्यावे लागतात. त्यानुसार एस.टी.कडून पैसे मिळत असूनही ठेकेदाराने कर्जाचे हप्ते कसे भरलेले नाहीत? परिणामी, गाड्या ओढून नेण्याची नामुष्की ओढवली आहे.

Web Title: Kolhapur News action on Shivshahi Bus for Overdue loan