धर्मनिरपेक्षतेची भावना लोकच टिकवतील - ॲड. असिम सरोदे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

कोल्हापूर - ‘‘लोकांच्या मनात धर्मनिरपेक्षता रुजली आहे, भारतीय घटनेतून ती आली आहे. त्यामुळे निवडणुकांवर डोळा ठेवून धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून होतोय. त्यामुळे काही फरक पडणार नाही. अनिवासी पंतप्रधान मोदी आज आहेत, उद्या नसतील; पण लोकांच्या मनातील धर्मनिरपेक्षतेवरील विश्‍वास अधिक दृढ होणार आहे,’’ असे मत सामाजिक कार्यकर्ते ॲड. असिम सरोदे यांनी येथे व्यक्त केले. येथील शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे शाहू व्याख्यानमालेत ‘धर्मनिरपेक्षता आणि भारतीय राज्य घटना’ या विषयावर ते बोलत होते.

ॲड. सरोदे म्हणाले, ‘‘संविधानातील समाजवादी विचारधारेला पंतप्रधान मोदी आव्हान देत आहेत; तर त्यांचा सत्ताधारी भाजप पक्ष उद्धट भावनेतून धर्मभेदाचा आधार घेऊन घटनेतील तत्त्वांचे उल्लंघन करतो आहे, वास्तविक धर्मनिरपक्षेता टिकविण्यात लोकांचा मोठा सहभाग असल्याने त्यांना यश येत नाही असे दिसते. धर्मनिरपेक्षतेची भावना महात्मा गांधींनी देशाला सांगितली, त्यांच्या उपोषण आंदोलनामागील भावनांचा आदर करणारे, विचारात घेणारे पूर्वी पक्ष व नेते होते. नव्या सत्ताधाऱ्यांना हीच भावना नकोशी झाली आहे. म्हणून ‘उपोषण करा, अन्यथा मरा’, आम्ही तुमची दखल घेणार नाही’ असा उद्धट भाव त्यांचा आहे.’’ ते म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या तोंडावर ३७० कलम असो वा राम जन्मभूमीचा असे विषय निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत आणले जातात.’’

धर्मनिरपेक्षता शब्द घुसडला नाही
काँग्रेसच्या काळात ४२ वेळा घटनेत बदल केले. ‘धर्मनिरपेक्षता’ शब्द घुसडला असे सरसकट विधान केले जाते मात्र धर्मनिरपेक्षेता हा शब्द लोकसभेत चर्चा करून संविधानिक अधिकाराचा वापर करून घातला आहे, असेही ॲड. सरोदे यांनी सांगितले. 
 
Web Title: Kolhapur News AD Asim Sarode comment