वीज दरवाढ प्रस्तावाची कोल्हापुरात होळी

शिवाजी यादव
सोमवार, 30 जुलै 2018

कोल्हापूर - महावितरणने 22 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. यात घरगुती, औद्योगिक तसेच शेतीपंपाच्या ग्राहकांचा खर्चाचा भुर्दंड वाढणार आहे. या महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाची सोमवारी वीज ग्राहकांच्या वतीने महावितरणच्या कार्यालयासमोर होळी करण्यात आली.

कोल्हापूर - महावितरणने 22 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. यात घरगुती, औद्योगिक तसेच शेतीपंपाच्या ग्राहकांचा खर्चाचा भुर्दंड वाढणार आहे. या महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाची सोमवारी वीज ग्राहकांच्या वतीने महावितरणच्या कार्यालयासमोर होळी करण्यात आली.

ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले. प्रस्तावीत वीज दरवाढ रोखण्यासाठी ग्राहकांनी विज नियामक आयोगसमोर हरकती नोंदवाव्यात. तरीही संभाव्य वीज दरवाढ रद्द न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले. 

महावितरण कंपनीने विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या फेरआढावा याचिकेव्दारे अडीच कोटी ग्राहकांकडून 30 कोटी 842 कोटीची जादा वसुलीची मागणी केली आहे. त्यासाठी सरासरी 22 टक्के दरवाढ मागितली आहे. अशी वाढ लागू झाल्यास यात शंभर युनिटच्या खाली वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांना 83 पैसे प्रतियुनिट दरवाढ लादली जाणार आहे. इतर राज्याच्या तुलनेत औद्यागिक वीजचे दरही जास्त आहेत. तरीही नव्या वीज दरवाढी नुसार वीजदर दीड पट वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उद्योजकांना ही याचा फटका बसणार आहे. 

शेती पंपाच्या दरातील वाढही किमान 17 टक्के होणार आहे. त्यामुळे सर्वाधिक फटका कृषिपंपधारकांनाच बसणार आहे. राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी गळती रोखून विजेचे दर खाली आणू अशी आश्‍वासने दिली होती मात्र त्याची पूर्तत झालेली नाही याचा निषेध यावेळी करण्यात आला.

आंदोलनात महापौर शोभा बोंद्रे, आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, आमदार संजय घाटगे, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील - भुयेकर, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील आदी उपस्थित होते. 

जनशक्ती आधारे लढा उभारू - डॉ. एन. डी. पाटील ​
न्यायाच्या चौकटीत राहनू वीज दरवाढीस विरोध करण्यासाठी हरकती नोंदवू पण तरीही वीज दरवाढ रद्द न झाल्यास जनशक्तीच्या आधारे लढा तीव्र करू असेही डॉ. एन. डी. पाटील यांनी सांगितले. 

स्वतंत्र बैठकीसाठी विनंती करू - नरके 
मुख्यमंत्र्यांनी वीज दर आटोक्‍यात ठेवण्याचे अाश्‍वासन दिले आहे. मात्र ते पाळलेले नाही. नवीन प्रस्तावीत वीज दरवाढीचा फेरविचार व्हावा, तसेच शेतकऱ्यांच्या वीजेच्या प्रश्‍न आदी मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यासाठी स्वतंत्र बैठक लावावी.यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले. 

Web Title: Kolhapur News agitation against hike in electricity bill