शाळांच्या कंपनीकरणाच्या विरोधात कोल्हापूरात शुक्रवारी शाळा बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

कोल्हापूर - कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे, तसेच शाळांच्या कंपनीकरणाच्या विरोधात शुक्रवारी (ता. २३) शाळा बंद ठेवून मोर्चा निघणार आहे. सुमारे साडेचार हजार शाळा आणि सुमारे पन्नास हजार विद्यार्थी मोर्चात सहभागी होतील.

कोल्हापूर - कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे, तसेच शाळांच्या कंपनीकरणाच्या विरोधात शुक्रवारी (ता. २३) शाळा बंद ठेवून मोर्चा निघणार आहे. सुमारे साडेचार हजार शाळा आणि सुमारे पन्नास हजार विद्यार्थी मोर्चात सहभागी होतील. शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष सर्जेराव लाड तसेच संघटना प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व डी. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघेल.

गांधी मैदान येथून सकाळी दहाच्या सुमारास मोर्चास सुरवात होईल. शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप होईल. वीस पटाखालील शाळा बंद करून शासनाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. वाड्यावस्त्यावरील शाळा बंद करून गोरगरिबांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकही शाळा बंद पडू देणार नाही. ज्या २४ शाळांना बंद होणार आहेत, तेथील विद्यार्थी आणि पालकही मोर्चात सहभागी होतील. वसंतराव देशमुख, जयंत आसगांवकर, प्रभाकर आरडे, दादा लाड, लाला गायकवाड, दादा लाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, गणी आजरेकर, गिरीश फोंडे, अशोक पोवार, रमेश मोरे, भरत रसाळे, वसंत मुळीक, गणपतराव बागडी. आर. डी. पाटील, प्रा. समीर घोरपडे आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Agitation against school Company conversion