राजारामपुरी 11व्या गल्लीत होणार विमानाचे "टेकऑफ' 

राजारामपुरी 11व्या गल्लीत होणार विमानाचे "टेकऑफ' 

कोल्हापूरचे विमानतळ सुरू होईल की नाही हे माहिती नाही. पण राजारामपुरी अकराव्या गल्लीत मात्र नक्कीच विमानाचे "टेकऑफ' होणार आहे. यासाठी तेथे धावपट्टीही तयार केली आहे. कोल्हापूरची झालेली दुर्दशा आता हवेतून पहा आणि बिघडलेली स्वयंशिस्त पुन्हा लावा, असाच संदेश या विमानातून दिला जाणार आहे. 

कोल्हापूर सुजलाम सुफलाम आहे. तेथे पाणी भरपूर आहे. शेती चांगली आहे. वातावरण चांगले आहे. परंतू गेल्या वीस वर्षात स्वयंशीस्त हरवून बसलो आहे. त्यामुळे कोल्हापूर काय झाले आहे हे आता जमीनीवर राहून कळत नाही. त्यामुळे आता हवेतून कोल्हापूरची अवस्था काय करून ठेवली, हे पहायचे आहे. ही संधी सर्वांना मिळणार आहे. 

यासाठी राजारामपुरीतील तेराव्या गल्लीत पन्नास सीटर विमान उतरणार आहे. त्यासाठी साधारण साठ हजार रुपये खर्च करून रस्त्यावर धावपट्टीही बनवली आहे. विमानतळाचा लूकही आता तयार होत आहे. तुम्ही 26-27 ऑगस्टपासून या विमानात बसू शकणार आहे. विमानाचे टेकऑफ होताना जो अनुभव आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतो तोच अनुभव येथे येणार आहे. हवाई सुंदरीही असणार आहेत. विमानत बसल्यानंतर सुमधूर आवाजात वेगवेगळ्या सुचनांही ऐकण्यास मिळणार आहेत. पूर्ण वाताणुकूलीत विमानात उड्डाणापूर्वी सीटबेल्टही लावावा लागणार आहे. विमान उड्डाण होताना त्याचा घडघड करणारा आवाज ही ऐकावा लागणार आहे. जेंव्हा विमान हवेत जाईल तेंव्हा तेथून कोल्हापूरची झालेली दुर्दशा पाहण्यास मिळणार आहे. ही दुर्दशा रोखण्यासाठी ही तेथे प्रबोधन केले जाणार आहे. 

राजारामपुरी अकराव्या गल्लीतील युवक मित्र मंडळाकडून हा देखावा केला जाणार आहे. याची तयारी ऍड.बाबा इंदुलकर,ऍड.शिवप्रसाद वंदुरे-पाटील, प्रभु निकम, किशोर मळेकर, गौरव करोडे, राजू थोरात, प्रशांत मगदूम,ओंकार देशपांडे,अनिल सावंत, त्र्येंबकराव शिंदे,अमय मळेकर हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com