अजय देवगणने काजोलसह घेतले श्री अंबाबाईचे दर्शन 

संभाजी गंडमाळे
मंगळवार, 20 मार्च 2018

कोल्हापूर - बॉलीवूडस्टार अजय देवगणने आज पत्नी काजोलसह श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. खास विमानाने आज हे दांपत्य कुटुंबीयांसह येथे दाखल झाले. दुपारी एकच्या सुमारास मंदिरात दर्शन घेवून मिरजकर तिकटी येथील श्री एकमुखी दत्त आखाडा सेवाभावी संस्थेच्या कलशारोहण सोहळ्याला त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी विविध धार्मिक विधी झाले. यात त्यांनी सहभाग घेतला. (व्हिडिआे - बी. डी. चेचर) 

गेली काही वर्षे गुढीपाडव्यानंतर अजय देवगण अंबाबाईच्या दर्शनासाठी येतो. यावेळी त्याने कुटुंबीयांसह दर्शन घेतले. त्यांच्या आगमनाची माहिती मिळतात अंबाबाई मंदिर ते मिरजकर तिकटी परिसरात चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी नियंत्रणासाठी पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष महेश जाधव, संगीता खाडे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत झाले. (व्हिडिआे - सचिन सावंत)

Web Title: Kolhapur News Ajay Devgan and Kajol in Amababi Temple