गोरगरीबांना लुटून धनदांडग्यांना मोठे करणाऱ्या सरकारला घालवण्याची वेळ - अजित पवार

प्रकाश तिराळे
सोमवार, 2 एप्रिल 2018

मुरगूड - शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव नाही, अडीच हजार कोटींची ऊसाची बाकी द्यायची आहे. 89 लाख शेतकऱ्यांची 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देतो म्हणून घोषणा करणारे हे सरकार गोरगरीबांना लुटून धनदांडग्याना मोठे करण्यात मग्न आहे. आता या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असा हल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारवर चढविला.

मुरगूड (ता. कागल ) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित हल्लाबोल सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल सभेचा प्रारंभ मुरगूड येथील सभेने झाला. 

अच्छे दिन येणार म्हणून वाट बघणाऱ्या लोकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे.

- अजित पवार

अजित पवार म्हणाले, दिल्लीत शरद पवार कृषिमंत्री होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. पण आता तिथे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कोणी नाही. आमच्या शेतकऱ्याला स्थैर्य मिळवून देण्यासाठी गोरगरीबांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि सर्वच क्षेत्रातील विकासाठी दिल्लीत शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी साथ द्या असे आवाहन ही त्यांनी केले.

नवसाने पोर जन्मले आणि मुके घेऊन मारले अशी या सरकारची अवस्था झाली आहे. या सरकारमधील मंत्र्यांनी कशात भ्रष्टाचार केला नाही तेवढं सांगा. भ्रष्टाचाराच्या मुक्क्याने या सरकारचे मरण झाल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही क्षेत्रात हे सरकार यशस्वी झालेले नाही.

- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते

अजित पवार यांनी आपल्या 40 मिनीटाच्या तडाकेबंद भाषणात भाजप सरकारच्या कारभारावर चौफेर हल्ला चढविला.

या खोटारड्या सरकारने गेल्या तीन वर्षात लोकहिताचे एकही काम केले नाही. हे सरकार कर्जमाफीसाठी कधीही सकारात्मक नव्हते. त्यामुळे जनतेला फसवण्याचे काम हे सरकार करत आहे.

- सुनील तटकरे

स्वागत माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांनी केले. प्रास्ताविक आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार शिवानंद माळी यांनी मानले.

सभेस आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयदेव गायकवाड, भगवानराव साळोखे, प्रकाश गजबीजे, रणजितसिंह मोहिते, ईश्वर बाळबुध्दे, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, महिला अध्यक्षा चित्राताई वाघ, आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष नाविद मुश्रीफ, प्रमोद हिंदूराव, रामराजे बडबुते, अजिक्य राणा पाटील, लक्ष्मीकांत खाबिया, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, संगीताताई खाडे, कल्पेश पाटील, मनिषाताई पाटील, सारंग पाटील, सचिन भोईटे, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, युवराज पाटील, सतीश पाटील, कृष्णात पाटील, निलेश शिंदे आदी उपस्थित होते.

रॅलीने स्वागत 
उपस्थित सर्व नेत्याचे स्वागत परिसरातील सुमारे दोन हजार मोटरसायकलस्वारांनी केले. निढोरी ते मुरगूड या मार्गावरुन उघड्या जीपमधून मान्यवरांना रॅलीने आणण्यात आले.

Web Title: Kolhapur News Ajit Pawar Comment