सरकारने शब्दांचा खेळ थांबवला नाही तर आवाज उठवू- अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

संघर्ष यात्रा काढली म्हणूनच कर्जमाफी मिळाली असं नाही. तर शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली, त्यामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली.

- अजित पवार

कोल्हापूर : "कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार शब्दांचा खेळ करत आहे. त्यांनी हा खेळ थांबवला नाही तर येत्या अधिवेशनात आवाज उठवू," असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 

"एखादा मुद्दा अंगलट आला तर सरकार सोयीचा निर्णय घेत आहे.. जशी नवीन माहिती समोर येत आहे तसं सरकार GR बदलत आहे...," अशी टीका पवार यांनी फडणवीस सरकारवर केली.

येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "शेतकऱ्यांना सतत कर्जमाफी मिळावी या मताचा मी नाही. पण, शेतकरी नैसर्गिक संकटात असला तर त्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे. संघर्ष यात्रा काढली म्हणूनच कर्जमाफी मिळाली असं नाही. तर शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली, त्यामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली."

सुनील तटकरे म्हणाले, "मी आणि अजितदादा गेल्या १८ जूनपासून संघटनात्मक बांधणीसाठी बाहेर पडलो आहे. संघटनात्मक बांधणीसाठी या पूर्वी वेळ मिळाला नव्हता.  नेतृत्वाची दुसरी फळी तयार करण्याचं धोरण ठरवलं आहे. दुसरी फळी २८ ते ३२ वयोगटातील तयार करत आहोत.

GST करप्रणालीची अंमलबजावणी करत असताना त्यामध्ये सुटसुटीतपणा आणण्याची गरज आहे. LBT रद्द केल्यामुळे महाराष्ट्राचं ४० हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे."

निवडणुकीला तयार रहा
"शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असं सध्या तरी वाटत नाही. तरीदेखील मध्यावधी निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीला तयार व्हा. एखाद्या पक्षाला सत्ता मिळाली नाही तर; त्या पक्षाचा जनाधार कमी झालाय असं नाही," असे तटकरे यांनी सांगितले. 

■ ई सकाळ वरील ताज्या बातम्या
ठाणे: कळव्यात गाळा देण्याच्या नावाने तिघांनी केली 50 लाखाची फसवणूक
पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूकीची कोंडी
यवतमाळ: मतिमंद अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत
‘गळाभेट’ने पाषाणभिंतींना पाझर
चंद्रपूर: कावठी गावात बिबट्याची दहशत; बंदोबस्ताची मागणी
पुणे: पुरेसा पाऊस झाल्याने जुन्नरमध्ये भात लावणीची कामे सुरू
अभिनेता अमेय वाघ आणि साजिरी अडकले विवाहबंधनात
राहुल देशपांडे यांनी घातली विठाईला साद
चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार
शाहरूख-अनुष्का देणार पब्जना भेट

Web Title: Kolhapur news Ajit pawar intimates to raise loan waiver issue in assembly session