विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा अन्यथा उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकू

संदीप खांडेकर
रविवार, 24 जून 2018

कोल्हापूर - अकरावी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवून उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकणार, असा इशारा आॅल इंडिया स्टुडंटस फेडरेशनचे गिरीश फोंडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. उद्या (ता. २५) उपसंचालकांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री.फोंडे म्हणाले,"यंदा अकरावी प्रवेशासाठी प्रवेश पत्र दहा रुपयांनी वाढविले आहे. यास आमचा विरोध आहे. प्रवेश पत्रातून जमा झालेले सात लाख रुपये प्रशासनाकडे पडून आहेत. या पैशातून विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र द्यावीत. अन्यथा माफक शुल्कात ती उपलब्ध करावीत. अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होत असली तरी काही शिक्षण संस्था बेकायदेशीररित्या पैसे घेऊन प्रवेश देत आहेत. प्रशासन हा गैरकारभार रोखण्यात अपयशी ठरले आहे."

ते म्हणाले, "दहावी उत्तीर्णतेचे प्रमाण वाढत असताना अनुदानित तुकड्यांची वाढ आवश्यक आहे. पण, शासनाने विनाअनुदानीत तुकड्या महाविद्यालयांना देऊन आपली जबाबदारी झटकली आहे. समान गुण असणाऱ्यांना किंवा थोड्या गुणांचे अंतर असणाऱ्यांपैकी काही जणांना अनुदानित तुकडी तर काहींना विना अनुदानित तुकडी मिळत आहे. विना अनुदानित तुकडीत हजारो रुपये शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडून आकारले जात आहे."

पत्रकार परिषदेस प्रशांत आंबी, हरीश कांबळे, आरती रेडेकर, कृष्णा पानसे, अमोल पांढरे उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News all India students federation agitation hint