दातृत्वातही सजते दिवाळी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - येथील महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे यंदा पाचशे कुटुंबांना फराळाचे वितरण केले जाणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली असून, एकूण अडीच हजार किलोंचा फराळ तयार झाला आहे. एकूण साडेपाच लाख रुपये ट्रस्ट त्यासाठी खर्च करणार आहे.

ट्रस्टने यंदा पाचशे गरजू कुटुंबांची माहिती संकलित केली आणि त्यांना मोफत फराळाचे वितरण करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक कुटुंबाला खाजा, शंकरपाळी, लाडू, चिवडा-शेव आणि चकली असे फराळाचे पदार्थ प्रति एक किलोप्रमाणे दिले जातील. सीपीआरमध्ये दाखल असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठीही ट्रस्टतर्फे पाचशे फराळांची पाकिटे वितरित केली जाणार आहेत.

दवाखान्यात असतानाही या कुटुंबांना दिवाळी साजरी करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्याशिवाय शहर आणि परिसरातील शंभर एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांच्या कुटुंबीयांची माहिती ट्रस्टने संकलित केली असून, या कुटुंबांनाही प्रत्येकी तीन किलो फराळाचे वितरण केले जाणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Allocation of Dipawali sweet to 500 families

टॅग्स