रंकाळ्याच्या विकासासाठी आठ कोटी रुपयांचा प्रस्ताव - अमल महाडिक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

फुलेवाडी - कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलावाच्या विकासासाठी आठ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनास सादर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास मंजुरी देण्याची ग्वाही दिल्याने लवकरच प्रस्तावाला मंजुरी मिळेल, असा विश्‍वास आमदार अमल महाडिक यांनी  येथे व्यक्त केला.

फुलेवाडी - कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलावाच्या विकासासाठी आठ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनास सादर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास मंजुरी देण्याची ग्वाही दिल्याने लवकरच प्रस्तावाला मंजुरी मिळेल, असा विश्‍वास आमदार अमल महाडिक यांनी  येथे व्यक्त केला.

भाजप व मोबाईल ग्रुप फाउंडेशनतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त रंकाळा पदपथ उद्यानाच्या व्यासपीठावर आयोजित अटल संध्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेल्या या ऐतिहासिक रंकाळ्याचे संवर्धन होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या दोन दिवसांत कोल्हापुरात घडलेल्या घटना निंदनीय आहेत. आपण शाहूंच्या विचाराचे पाईक आहोत, त्यांचा विचारच पुढे नेण्याची गरज आहे.

- अमल महाडिक, आमदार

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ‘‘रंकाळ्याच्या रम्य काठी लोकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे, त्यास सहकार्य करू.’’

या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नगरसेवक किरण शिराळे, शेखर कुसाळे, किरण नकाते, मनीषा कुंभार, संतोष गायकवाड, अशोक देसाई उपस्थित होते. उपाध्यक्ष अमोल पालोजी यांनी स्वागत केले. हेमंत आराध्ये यांनी प्रास्ताविक केले. मोबाईल ग्रुपचे गणेश पाटील, भगवान पाटील, संदीप पाटील, रोहित कांदेकर, समीर दिवेकर आदी संयोजन करत आहेत.

रंकाळ्यावर सांस्कृतिक मेजवानी
रंकाळ्याचा रम्य काठ, हवेत मंद गारवा अशा उत्साही वातावरणात ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. गणेश वंदनेने कार्यक्रमास सुरवात झाली. वासुदेव आला हो, ओवी, कानडा राजा पंढरीचा, माऊली-माऊली, काळ्या मातीत-मातीत, जांभूळ पिकल्या झाडाखाली अशी मराठी गीते नृत्यासह सादर करण्यात आली. आज रविवारी पार्श्‍व निर्मित ‘सजदा’ कार्यक्रम सादर होणार आहे.

Web Title: Kolhapur News Amal Mahadik comment