अमर पाटील यांचा रंकाळ्यात आठ तास पोहण्याचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

कोल्हापूर - शेहेचाळीस वर्षीय अमर जयसिंग पाटील यांनी रंकाळा तलावात आठ तास सहा मिनिटे पोहण्याचा उपक्रम केला. तलावातील पाणी पोहण्यासाठी चांगले असल्याचा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या या उपक्रमास अनेकांनी दाद दिली.

कोल्हापूर - शेहेचाळीस वर्षीय अमर जयसिंग पाटील यांनी रंकाळा तलावात आठ तास सहा मिनिटे पोहण्याचा उपक्रम केला. तलावातील पाणी पोहण्यासाठी चांगले असल्याचा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या या उपक्रमास अनेकांनी दाद दिली.

रंकाळा कोल्हापूरच्या वैभवात भर घालत असताना त्यातील पाण्याबाबतची टीका श्री. पाटील यांना झोंबत होती. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ’ असल्याचे लक्षात घेत त्यांनी तलावात आठ तास पोहण्याचा निर्णय घेतला.

विश्‍वंभर कुलकर्णी, श्री. पाटील, श्री. किल्लेदार  यांच्याशी त्यांनी त्याविषयी चर्चा केली. कोल्हापूर जिल्हा जलतरण असोसिएशन व महाराष्ट्र राज्य जलतरण असोसिएशनकडे रीतसर अर्ज करून मान्यता मिळवली. तसेच पोलिस खात्याला स्वतःच्या जबाबदारीवर हा उपक्रम करत असल्याचा अर्जही दिला.

परवानगी मिळताच राज्य कोल्हापूर जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष आनंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार केली. यात असोसिएशनचे सचिव ॲड. किरण पाटील, ॲड. सुशील पाटील यांना उपक्रमप्रमुख, निलांबर लब्दे यांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले. पंच म्हणून  नीलकंठ आखाडे व अभिषेक पाठक यांच्यावर जबाबदारी सोपवली. उपक्रमाचे नियोजन अजय पाठक यांच्यावर सोपवले. 

श्री. माने यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. यावेळी नीलकंठ आखाडे, अभिषेक पाठक, बोट क्‍लबचे अमर जाधव, सुनील चव्हाण, संदीप नाईक, महानगरपालिकेचे डॉ. पाटील, डॉ. चौगुले, डॉ. दवे, डॉ. जाधव व वैद्यकीय पथक, प्रा. विश्‍वंभर कुलकर्णी उपस्थित होते. 

पाटील यांनी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी पोहण्यास प्रारंभ केला. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जलतरणप्रेमी हजर होते. त्यांच्या या साहसी उपक्रमास नगरसेवक अर्जुन माने, गटनेता शारंगधर देशमुख, प्रताप जाधव, संदीप नेजदार, राज्य जलतरण असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर शानभाग, राजेंद्र पालकर यांनी प्रोत्साहन दिले.

Web Title: Kolhapur News Amar Patil Venture swimming in Rankala