अंबाबाई मंदिरात कायमस्वरूपी आरोग्य केंद्र 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिरात आता मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र, मंदिर परिसरात कायमस्वरूपी आरोग्य केंद्र नाही. लवकरच मंदिरात आरोग्य केंद्र सुरू करणार असून तेथे डॉक्‍टरांचे पथक कार्यरत असेल, अशी माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंदिर परिसर शंभर टक्के प्लास्टिक व अतिक्रमणमुक्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खजानीस वैशाली क्षीरसागर, सदस्या संगीता खाडे, सचिव विजय पोवार, शिवाजी साळवी, सुदेश देशपांडे उपस्थित होते. 

श्री. जाधव म्हणाले, ""समितीच्या अखत्यारित एकूण तीन हजार बेचाळीस मंदिरे असून दहा हजार 492 हेक्‍टर इतकी जमीन आहे. जमीनींची माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू असून जमीनीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. अंबाबाई मंदिरातील सुरक्षेसाठी अद्ययावत सीसीटीव्ही बसवले जाणार असून दोन महिन्यातून एकदा बैठक घेतली जाणार आहे. विविध सामाजिक कामांसाठीही समिती निधी खर्च करणार असून समितीच्या वतीने अन्नछत्र व भक्त निवास उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मंदिर परिसरात एकही जाहिरात लागणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जाईल. मंदिर विकास आराखडा, जोतिबा मंदिर विकास आराखडा राबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. त्याशिवाय त्र्यंबोली मंदिर परिसर विकास आराखडाही प्रस्तावित आहे.'' 

खजानीस क्षीरसागर म्हणाल्या, ""भक्तनिवासापासून भाविकांना मोफत बसेससाठी प्रयत्न केले जातील. कोर्टातील बावन्न कोटी रूपयांची रक्कम देवस्थानला मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याशिवाय अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमण्यासाठीही समितीचा आग्रह राहील.'' 

सचिव विजय पोवार म्हणाले, 2007 ते 2012 मधील लेखापरिक्षण अंतिम टप्प्यात आहे. देवस्थान अस्तित्वात येण्यापूर्वीचे ताळेबंद नाहीत. ते तयार करण्याचे आदेश शासनाने दिले असून ते काम अंतिम टप्प्यात आहे.'' 

देवस्थानकडील दागिणे 
समितीच्या अखत्यारितीतील मंदिरात आजअखेर 86 हजार 21 ग्रॅम इतके सोन्याचे तर 24 लाख 24 हजार 961 ग्रॅम चांदीचे दागिणे अर्पण झाले आहेत. त्याचे रितसर मूल्यांकन झाले आहे. एकूण ठेव सुमारे 107 कोटींची आहे. आजअखेर एकूण उत्पन्न 139 कोटी 87 लाखांचे आहे. एप्रिल 2017 पासून 37 लाख खंड वसुली झाली आहे. त्याशिवाय मंदिरांत मिळून एकूण 36 दानपेट्या आहेत. 

लोगोसाठी स्पर्धा 
देवस्थान समितीचे अधिकृत बोधचिन्ह अजून नाही. त्यासाठी समितीने बोधचिन्ह (लोगो) स्पर्धा जाहीर केली असून इच्छुकांनी ते पाठवावेत, असे आवाहन केले. सर्वोत्कृष्ट बोधचिन्ह करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला एकवीस हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. 

केमिकलयुक्त कुंकू 
मंदिर परिसरात केमिकलयुक्त हळदी-कुंकूचा सर्रास वापर होत आहे. त्याचे दुषःपरिणाम सर्वांनाच माहिती आहेत. त्यामुळे ओरिजनल हळदी-कुंकूच येथे भाविकांना मिळेल, यासाठी समिती आग्रही असेल. समितीच्या कामाचा अहवाल प्रत्येक वर्षी प्रसिध्द केला जाईल, असेही श्री. जाधव म्हणाले. 

Web Title: kolhapur news ambabai mandir