दुसऱ्या दिवशी किरणे देवीच्या कंबरेपर्यंत

संभाजी गंडमाळे
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्यात गुरूवारी (ता. 1) दुसऱ्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणं मूर्तीच्या कंबरेपर्यंत पोचली आणि डावीकडे लुप्त झाली. देवीच्या मुखकमलावर फार काळ न विसावता खांद्यापासूनच किरणे डावीकडे लुप्त झाली. आज (ता. २) किरणोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. 

सायंकाळी पाच वाजून २७ मिनिटांनी किरणे महाव्दारात आली. त्यानंतर पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी गणपती मंदिर आणि त्यानंतर बारा मिनिटांनी पितळी उंबऱ्यापर्यंत आली. सहा वाजून बारा मनिटांनी पहिल्या पायरीपर्यंत तर पुढे एक मिनिटाने दुसऱ्या पायरीपर्यंत पोचली. सहा वाजून पंधरा मिनिटांनी तिसरी पायरी, तर त्यानंतर तीन मिनिटांनी किरणांनी देवीचा चरणस्पर्श केला. सहा वाजून १९ मिनिटांनी किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत आली आणि डावीकडे लुप्त झाली.

दरम्यान, कालच्या तुलनेत किरणांची तीव्रता कमी होती, असे अभ्यासक प्रा. किशोर हिरासकर, प्रा. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले. चेतन चौधरी या भाविकाच्या वतीने पाचशे ओटींचे वितरण झाले. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संगीता खाडे, महापालिका आतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उदय गायकवाड, शहीर राजू राऊत आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Ambabai Temple Kiranotsav