अंबाबाई मंदिरात शाहू वैदिक स्कूलचे पुजारी नेमण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात शाहू वैदिक स्कूलचे पुजारी नेमावेत, अशी मागणी आमदारांनी विधानसभेमध्ये केली होती. त्याला विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्र्यांनी तत्त्वतः मान्यताही दिली होती. त्याप्रमाणे शाहू वैदिक स्कूलमधील पुजाऱ्यांची मंदिरात नियुक्ती करावी, अशी मागणी श्री करवीर निवासिनी अंबाबाई पुजारी हटाव कृती समितीने केली आहे.

पत्रकात म्हटले आहे, विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आमदारांनी पुजारी म्हणून शाहू वैदिक स्कूलमधील पुजारी नेमावेत, अशी मागणी केली होती. राज्यमंत्र्यांनी मागणीला तत्त्वतः मान्यता दिली होती. त्यामुळे त्यांची नियुक्ती मंदिरात पगारी पुजारी म्हणून करावी. या वैदिक स्कूलची स्थापना राजर्षी शाहू महाराजांनी केली होती.

मराठा लाईट इन्फन्ट्रीतही पुजारी म्हणून येथील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत असून त्यांना नाईक पदाचा दर्जा दिला जातो. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधिकार या कायद्यामुळे संपुष्टात येणार आहेत. अशा वेळी समितीने स्वयंघोषित कमिटी नेमून पुजाऱ्यांची नियुक्ती करणे हा विधिमंडळाचा हक्कभंग नव्हे का? असे पत्रकात म्हटले आहे. पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले असून, कायदा अमलात आणण्याची विनंतीही यामध्ये केली आहे.

Web Title: Kolhapur News Ambabai Temple Pujari selection issue