पवित्र पोर्टलला विरोध करणारा ठराव मांडणार - अंबरिश घाटगे

संदीप खांडेकर
शुक्रवार, 20 जुलै 2018

कोल्हापूर - पवित्र पोर्टलचा गाजावाजा जणू संस्थाचालक भ्रष्टाचारीच आहेत, अशा पद्धतीने केला जात आहे. पवित्र पोर्टल लावायचे असेल तर ते मेडिकल व इंजिनियरिंग महाविद्यालयांना लावा. शिक्षण संस्था चालकांनो पाणी आता गळ्याशी आले आहे. वेळीच हातपाय हलवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती आंबरिश घाटगे यांनी आज येथे केले.

जिल्हा परिषदेच्या १० आॅगस्टला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत पवित्र पोर्टलला विरोध करणारा ठराव मांडणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था व जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे आयोजित बैठकीत ते होते. श्री. घाटगे म्हणाले, "काही राज्यकर्ते संस्थाचालक आहेत. मात्र, आता शासन पवित्रचा गाजावाजा करत संस्थाचालक भ्रष्टाचारी असल्याचा डांगोरा पिटत आहे. शासनाने टाकलेला डाव संस्थाचालकांच्या गळ्यापर्यंत आला आहे. त्यामुळे संस्थाचालकांना हातपाय हलवल्याशिवाय पर्याय नाही."

अध्यादेशाची होळी 

पवित्र पोर्टलच्या अध्यादेशाची होळी करत महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था व जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने सरकारविरोधात आज रणशिंग फुंकले. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये झालेल्या सभेनंतर अध्यादेशाचे होळी करत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाची तीव्रता यापुढे वाढवली जाणार असून शाळा बंद आंदोलन व समाजाचे प्रबोधन केले जाणार आहे.

Web Title: Kolhapur News Ambrish Ghatge comment