वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांत नाराजी

सुनील पाटील
सोमवार, 26 जून 2017

कर्जमाफीवर प्रतििक्रया - २५ हजार रुपये रक्कम तुटपुंजी असल्याचा दावा

कोल्हापूर - संस्था पातळीवर आपले खाते थकीत राहू नये, यासाठी अनेक उलाढाली करून जिल्ह्यातील साडेतीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली आहे. जे कर्जदार थकीत आहेत, त्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी आणि ज्यांनी वेळेत भरले त्यांना फक्त २५ हजार रुपये मिळणार असतील तर प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्यांनी कोणाचं घोडं मारलंय... असा सूर प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांत उमटत आहे. 

राज्य सरकारने ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. याचे स्वागत होत आहे; परंतु ज्यांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली, ते या निर्णयाने तुटपुंज्या लाभाचे हक्कदार होणार आहेत. जिल्ह्यातील ३० जून २०१६ अखेर ३ लाख २५ हजार शेतकऱ्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केली आहे. कर्ज न भरणाऱ्या वेगळ्या आणि कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेगळ्या समस्या नाहीत. जरी त्याने कर्जाची परतफेड वेळेत केली असली तरी तो जुने कर्ज फेडताना नवीन कर्ज काढून आणखी कर्जाच्या खाईत गेला आहे. याचाही विचार शासनाने केला पाहिजे, अशी मागणी होऊ लागली आहे. 

सरकारने कर्जमाफी दिली त्याचे स्वागतच आहे. मात्र जे थकीत कर्जदार आहेत, त्यांनाच याचा लाभ होणार असल्याने प्रामाणिकपणे कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर नेहमीच उपेक्षा आली आहे.  
- महादेव चव्हाण, शेतकरी माजगाव

प्रामाणिक शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांऐवजी दीड लाख रुपयांपर्यंतचे भरलेले कर्ज पुन्हा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
- शंकर दिवसे, सावरवाडी

Web Title: kolhapur news Angered farmers who repay in time