कोल्हापूर जिल्हा परिषदेचा लिपीक लाचलुचपतच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - रजेचे प्रमाणपत्र, दैनदिन अहवाल देण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा सहायक लिपीक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. राजेश पांडुरंग कुंभार (वय 45, रा. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. आज दुपारी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. 

याबाबत लाचलुपच विभागाने दिलेली माहिती, संतोष हिंदूराव ढवळे (रा. शाहूनगर, जयसिंगपूर) हे जिल्हा परिषदेत सर्व शि7ा अभियानाच्या सहायक कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करतात. त्यांची एप्रिल महिन्यात सांगलीला बदली झाली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात सहायक लिपीक म्हणून राजेश कुंभार हा काम करतो. ढवळे यांना आर्जित शिल्लक रजेचे प्रमापत्र, दैनदिन अहवालासह शिल्लक वेतनाचा फरकासाठी आवश्‍यक कागदपत्रांची गरज होती. ती कागदपत्रासाठी ढवळे यांनी लिपीक राजेश कुंभार याच्याकडे अर्ज केला होता. मात्र तो टाळाटाळ करत होता. याकामासाठी त्याने सात हजार रुपये लाचेची मागणी केली.

तडजोडी अंती ही रक्कम पाच हजारावर ठरली. याबाबतची तक्रार ढवळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. काल याची पडताळणी करण्यात आली. आज दुपारी तीनच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पाच हजाराची लाच घेताना लिपीक राजेश कुंभारला पथकाने रंगेहात पकडल्याचे पोलिस अधीक्षक गिरीष गोडे यांनी सांगितले. 

Web Title: Kolhapur News anti corruption bureau arrest zp clerk