गोकुळ शॉपीत ७१ लाखांचा अपहार

गोकुळ शॉपीत ७१ लाखांचा अपहार

कोल्हापूर - ‘गोकुळ’च्या एका शॉपीमध्ये ७१ लाख २८ हजार ७८ रुपयांचा अपहार झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. जुन्या पुणे-बंगळूर रस्त्यावर असणाऱ्या शॉपीचे चौकशी अधिकारी तथा विशेष लेखापरीक्षक जी. व्ही. निकाळजे यांनी विशेष कार्यकारी अधिकारी लेखापरीक्षा मंडळ (पदूम) यांच्याकडे अहवाल दिला आहे. शॉपीचे व्यवस्थापक अमित अशोकराव पवार यांच्यावर अपहारातील रक्कम निश्‍चित केली आहे.

या शॉपीमधून दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री होते. २०१२ पासून व्यवस्थापक म्हणून ‘गोकुळ’च्या माजी संचालिका रंजना अशोकराव पवार यांचे चिरंजीव अमित कार्यरत आहेत.

पवार यांनी एप्रिल २०१६ ते जुलै २०१७ मध्ये ‘गोकुळ’कडून मिळालेल्या पदार्थांची विक्री केल्यानंतर रक्कम संबंधित विभागाकडे जमा केली नाही. याबाबत सुमारे ६३ लाख १८ हजार रुपयांचा अपहार झाल्याची शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली. तक्रारीनंतर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला; पण तक्रारदार माजी आमदार संपतराव पवार यांनी विभागीय सहनिबंधक, उपनिबंधकांकडे पाठपुरावा केला.

माजी आमदार पवार यांच्या तक्रारीनुसार विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी चौकशी अधिकारी म्हणून निकाळजे यांची नियुक्ती केली. निकाळजे यांनी नोव्हेंबरपासून चौकशी सुरू केली होती. चौकशीस विलंब होत असल्याने पुन्हा पवार यांनी तक्रार केल्यानंतर ९ मे रोजी निकाळजे यांनी ५९ पानी अहवाल सादर केला. यात ६३ लाख ४५ हजार ५९२ रुपयांची दुग्धजन्य पदार्थांची विक्री करून रक्कम ‘गोकुळ’कडे जमा न केल्याचा ठपका ठेवला आहे. तसेच पवार यांनी आवक-जावक रजिस्टरमध्ये नोंद केलेली नाही. १८ लाख १८ हजार रुपयांचे धानदेश न वटल्यामुळे या रकमेची जबाबदारी पवार यांच्यावर निश्‍चित केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com