कोल्हापुरातील रविवार पेठेत जमावाचा सशस्त्र हल्ला

राजेश मोरे
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

मुस्लिम बोर्डींग वादातून घडला प्रकार ; घरासह मोटारसायकलची तोडफोड

कोल्हापूर: मुस्लिम बोर्डींग निवडणुकीच्या वादातून 30 ते 40 जणांच्या जमावाने रविवार पेठेतील महात गल्लीत सशस्त्र हल्ला केला. यात एका घरासह चार वाहनांची तोडफोड केली. मोटारयाकलसह गल्लीतील मंडळाचे कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. आज (बुधवार) दुपारी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मुस्लिम बोर्डींगची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत गणी आजरेकर पॅनेलचे समर्थक म्हणून शौकत इकबाल बागवान यांनी काम केले. ते रविवार पेठेतील बागवान गल्ली शेजारील महात गल्लीत राहतात. याच निवडणुकीच्या वादातून आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास 30 ते 40 जण तोंडाला कापड बांधून त्यांच्या गल्लीत शिरले. त्यांच्या हातात दगड, काठ्या, इंधनाच्या बाटल्या, शस्त्रे होती. त्यांनी बागवान यांच्या घरावर दगडफेक केली. त्याच्या दर्शनी काचा फोडल्या. यानंतर दारात लावलेली बुलेट इंधन टाकून पेटवली. त्यानंतर अन्य चार मोटारसायकलीची तोडफोड केली. यानंतर हल्लेखोर बागवान यांच्या घरात शिरले. त्यांनी तेथील साहित्य विस्कटले. घरातील महिलांना चाकूचा धाक दाखवला. तिजोरीतील साहित्य विस्कटले. यानंतर हल्लेखोरांनी येथील "तडाका' मंडळाचे कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला. तेथे उभी असणारी टेंपो रिक्षाची तोडफोड केली.

दरम्यान, हा प्रकार समजल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तो पर्यंत हल्लेखोर पसार झाले. तणावजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य राखीव दलाची तुकडी बोलविण्यात आली. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम लक्ष्मीपुरी पोलिसात सुरू होते.

Web Title: kolhapur news Armed mob attack in raviwar peth