रेंदाळ येथे जुगार खेळणार्‍या ११ जणांना अटक

बाळासाहेब कांबळे
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

जुगार अड्यावर अलिकडच्या काळात येथे झालेली ही पहिलीच मोठी कारवाई असून अटक झालेल्यात प्रतिष्ठीत कुटुंबातील काही जणांचा समावेश आहे. यापेैकी एक जण आगामी हुपरी नगर पालिका निवडणूकीतील नगरसेवक पदाचा इच्छूक उमेदवार आहे

हुपरी ( जि. कोल्हापुर ) - रेंदाळ ( ता . हातकणंगले ) येथे अंबाई नगरात सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्यावर  पोलिसानी धाड टाकून जुगार खेळणार्‍या ११ जणांना अटक केली. यावेळी पोलिसानी रोख एक लाख १० हजार रुपये, ५ मोटरसायकली व ११  मोबाइल संच, खेळातील पत्ते  असा सुमारे तीन लाख ८५   हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . गुरुवारी रात्री बारा च्या सुमारास पोलिसानी ही कारवाई केली.

जुगार अड्यावर अलिकडच्या काळात येथे झालेली ही पहिलीच मोठी कारवाई असून अटक झालेल्यात प्रतिष्ठीत कुटुंबातील काही जणांचा समावेश आहे. यापेैकी एक जण आगामी हुपरी नगर पालिका निवडणूकीतील नगरसेवक पदाचा इच्छूक उमेदवार आहे. कांही दिवसांपुर्वी हुपरी पोलिस ठाण्याची सुत्रे हाती घेतलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या ' दबंग' स्टाइल कारवाईची चर्चा लोकांत सुरु आहे .

अटक करण्‍यात आलेल्‍या संशयितांची नावे अशी , रतन विलास एकांडे ( वय ३५ रा. अंबाई नगर ) , मनोज मायाप्पा सरगर ( वय ३० रा. शिवाजी नगर हुपरी ) , बाळासाहेब भिमराव हिंगमीरे ( वय ३७ रा . बिरदेव नगर , रेंदाळ ) , अजित बाबुराव पाटील ( वय ૪७ रा . कुन्नूर ता . चिकोडी ) , प्रमोद भाऊसाहेब पोवार ( वय २९  रा. शिवाजी नगर हुपरी ) , संजय मारुती माने ( वय ૪५ रा . अंबाई नगर  ), रफिक मकदुम हुसेन बसपुरे ( वय ૪३ रा. यळगुड ), प्रकाश रामचंद्र शेडबाऴे ( वय ૪० रा . अंबाई नगर रेंदाळ ), संजय लक्ष्मण व्हटकर ( वय ३२ रा . माने नगर रेंदाळ ) , किसन महादेव दाईंगडे ( वय ३७ रा . शिवाजी नगर हुपरी ) व विश्वास बाबुराव जाधव ( वय ૪२ रा. माने नगर रेंदाळ ). अधिक तपास उपनिरिक्षक एस. एम. पाटील करीत आहेत .

Web Title: kolhapur news: arrest police