कुरुंदकरच्या आजऱ्यातील घराची झडती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

आजरा - सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे बेपत्ता प्रकरणातील संशयित पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरांच्या येथील घराची झडती मुंबई येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने घेतली. दोन सहायक पोलिस निरीक्षक व सहा पोलिस कर्मचारी या पथकात सहभागी होते. सुमारे दीड तास पथकाने घराची झडती घेतली.

घरातील प्रत्येक खोलीची तपासणी केली. काही संशयास्पद वस्तू मिळते का याची पाहणी केली. ही तपासणी गोपनीय ठेवली आहे. या वेळी गुन्हा अन्वेषणच्या पथकांने कुरुंदकर यांच्या ताब्यात घेतलेल्या खासगी गाडीवरील चालकालाही बरोबर आणले होते. त्यांनेच कुरुंदकर यांचे घर दाखविले. झडतीमध्ये पथकाला विशेष काही मिळाले नसल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.

चार-पाच दिवसांपूर्वी पुणे येथून अटक केलेला संशयित आजऱ्यातीलच असल्याने त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी थेट आजऱ्यात येऊन कुरुंदकरांच्या घराची झडती घेतली. हाळोलीच्या फार्म हाऊसवर पथक जाणार असल्याची चर्चा होती. पण पथक तिकडे गेले नाही. पथक थेट कोल्हापूरहून सांगलीकडे रवाना झाले. कुरुंदकर यांचे शालेय शिक्षण येथे झाले असल्याने त्यांचा मित्र परिवार शहरात मोठा आहे.

Web Title: Kolhapur News Ashivini Bidre murder case