टोकाची ईर्षा...सळसळता उत्साह

कोल्हापूर - नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे आयोजित ॲथलेटिक्‍स नॅशनल टॅलेंट हंटच्या निवड चाचणीच्या उद्‌घाटन प्रसंगी बाबा देसाई, राजेश पांडे, जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, मंगेश बेंडखळे, प्रा. डॉ. पी. टी. गायकवाड आदी.
कोल्हापूर - नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे आयोजित ॲथलेटिक्‍स नॅशनल टॅलेंट हंटच्या निवड चाचणीच्या उद्‌घाटन प्रसंगी बाबा देसाई, राजेश पांडे, जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, मंगेश बेंडखळे, प्रा. डॉ. पी. टी. गायकवाड आदी.

कोल्हापूर - गेल इंडियन स्पीड स्टारच्या निवड चाचणीची उत्सुकता... दोन हजारांवर ॲथलेटिक्‍सपटूंची हजेरी...चाचणी सुरू होताच ईर्षा आणि जिद्दीचे आलेले प्रत्यंतर आणि सळसळत्या उत्साहाने भारवलेले क्षण... अशा वातावरणात नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे आयोजित नॅशनल टॅलेंट हंटला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर चाचणी झाली. 

शालेय व शाळाबाह्य मुलांसाठी ही चाचणी असल्याने ट्रॅकवर सकाळी आठपासूनच ॲथलेटिक्‍सपटू येत होते. शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, राधानगरी, गगनबावडा, शिरोळ, करवीर आदी तालुक्‍यांसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यातील ॲथलेटिक्‍सपटूंनी चाचणीत सहभाग घेतला. सुमारे सतराशे ॲथलेटिक्‍सपटूंनी चाचणीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. ११ ते १७ वयोगटातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम होत असल्याने पालक वर्गही ट्रॅकवर हजर होता. 

नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पांडे, जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, भाजपचे बाबा देसाई, गोकुळचे अरूणकुमार डोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चाचणीस सुरवात झाली. १००, २०० व ४०० मीटर प्रकारात ही चाचणी झाली. 

साऊथ इंडियाचे समन्वयक मंगेश बेंडखळे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक शिरगावकर, संजय जगताप, तुकाराम एंगडे, राजेश आढाव, महादेव सूर्यवंशी, संदीप जाधव, अनिल देसाई, अरूण पाटील, सुधीर मुंज, राहुल मगदूम यांनी चाचणीचे संयोजन केले.  निकाल असा :  १०० मीटर - १४ वर्षाखालील मुले - प्रतीक आवटी, श्रीधर वाडकर, राजवर्धन पाटील. १४ वर्षाखालील मुली - प्राजक्‍त्ता उडदे, पायल चौगुले, प्रतिक्षा साबळे, मयुरी पाटील, रिया पाटील, धनश्री पाटील, श्‍वेता माळवे. १३ वर्षाखालील - पूनम पाटील. 

२०० मीटर - १४ वर्षाखालील मुले - जगदीश आबिटकर, प्रतीक आवटी, राजवर्धन पाटील, अनिकेत पाटील, श्रीवर्धन पाटील, संदीप राजभट. १४ वर्षाखालील मुली - प्राजक्‍त्ता उडदे, श्‍वेता चिकोडी, सायली पाटील, श्‍वेता माळवे, समीक्षा पालकर, अनुष्का मोहिते. 

४०० मीटर - १४ वर्षाखालील मुली - सानिका गोजकर, पूर्वा शेवाळे. १७ वर्षाखालील मुले - विनायक नलावडे, निरंजन शेटके, रोहन कांबळे, यश येणेकर. १७ वर्षाखालील मुली - वैष्णवी पाटील, रोहिणी पाटील, तितिक्षा पाटोळे. 

१०० मीटर - १७ वर्षाखालील मुले - प्रफुल्ल पोवार, अभयसिंह भोसले, अनिकेत शिंदे, दिग्विजय चौगले, पृथ्वीराज चौगुले. १७ वर्षाखालील मुली - रसिका पाटील, ऋतुजा घराळ, रितिका महेकर, मानसी राजमाने. 

११० जिल्ह्यात चाचणी
देशातील ११० जिल्ह्यात निवड चाचणी होत आहे. मुंबई शहरात चाचणीचे आयोजन केले होते. कोल्हापुरात झालेल्या चाचणीला ॲथलेटिक्‍सपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सांगली, नाशिक, अकोला, नागपूर, सोलापूर येथे होणाऱ्या चाचणीसाठी ॲथलेटिक्‍सपटू मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्‍वास आहे, असे श्री. बेंडखळे यांनी सांगितले.   

कारभारावरच तोफ 
निवड चाचणी सुरू असताना श्री. पांडे यांच्याकडे सिंथेटिक ट्रॅक ॲथलेटिक्‍सपटूंना वेळेत उपलब्ध होत नसल्याची तक्रार क्रीडाप्रेमींतून व्यक्‍त्त झाली. शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड यांच्यासमोरच ही तक्रार झाल्याने त्यांनी तसे होत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, क्रीडाप्रेमी ऐकण्याच्या तयारीत नव्हते. त्यांनी सरावासाठी ट्रॅक मिळण्याकरिता ॲथलेटिक्‍सपटूंनी पैसे भरल्याचे सांगत क्रीडा विभागाच्या कारभारावरच तोफ डागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com