कोल्हापूर: वाटणीच्या वादातून सख्या भावावर तलवारीने हल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

शिवाजी पेठेेतील उभामारूती चौकात आनंदराव पाटील हे राहतात. त्यांना प्रसाद, जयदीप, योगेश अशी तीन मुले असून त्यांच्यात घराच्या वाटणीवरून कित्येक दिवस वाद सुरू आहे. याच वादातून आज सकाळी जयदीप व प्रसाद यांच्यात शाब्दीक वाद वाढला, थोडया वेळानंतर वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.

कोल्हापूर : घराची वाटणी वादातून सख्या भावावर हल्ला करण्याचा प्रकार आज (बुधवार) सकाळी दहाच्या सुमारास घडला.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले प्रसाद आनंदराव पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव असून त्यांना उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवाजी पेठेेतील उभामारूती चौकात आनंदराव पाटील हे राहतात. त्यांना प्रसाद, जयदीप, योगेश अशी तीन मुले असून त्यांच्यात घराच्या वाटणीवरून कित्येक दिवस वाद सुरू आहे. याच वादातून आज सकाळी जयदीप व प्रसाद यांच्यात शाब्दीक वाद वाढला, थोडया वेळानंतर वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.

यावेळी जयदिप याने घरातील तलवार आणून प्रसादच्या डोक्यावर मारली. यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला. प्रसाद याच्या डोक्यावरून रक्ताच्या धारा वाहत असतानाच त्याला नातेवाईक व मित्रमंडळींनी सीपीआरमध्ये दाखल केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Kolhapur news attack on brother in kolhapur