तरस सृदश्य प्राण्याने सात जनावराना केले फस्त 

संजय पाटील
मंगळवार, 29 मे 2018

घुणकी -  हातकणंगले तालुक्यातील नवे चावरे येथील चांदोली वसाहतीतील दत्ताञय  गणपती पाटील यांंच्या जनावरांच्या शेडवर तरस सदृश्य प्राण्याने हल्ला केला. यात दोन वासरे, दोन शेळ्या, दोन कोकरे अशा सात जनावरे ठार झाली आहेत. या घटनेत या शेतकऱ्याचे सुमारे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मध्यराञी घडली. काही दिवसापुर्वी  दोन शेतकऱ्यांच्या जनावरांचाही फडशा पाडल्याची घटना घडली होती. यामुळे शेतकऱ्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

नवे चावरे येथील चांदोली वसाहतीत दत्ताञय पाटील यांंचा जनावरांचा गोटा आहे. या गोट्यात गायीची दोन वासरे, दोन शेळ्या, तीन कोकरे होती. आज मध्यराञी तरस सदृश्य प्राण्याने जाळीतून गोट्यात प्रवेश करुन  सातही लहान जनावराना ठार मारले. विशेष म्हणजे तरस सदृश्य प्राण्याने  सर्वच जनावरांच्या  गळ्याला चावा घेऊन रक्त पिण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना  श्री. पाटील यांंच्या सकाळी निदर्शनास आली.

ही घटना समजताच अबालवृध्दानी पाहण्यास गर्दी केली. गोट्यात मृत अवस्थेत पडलेली वासरे, शेळ्या, कोकरे पाहून उपस्थितांची मने हेलावली.  

नरंदे येथील वनविभागाचे वनरक्षक श्री. जाधव यानी भेट दिली. तलाठी आर. बी. बावणे व पोलीस पाटील दिलीप महाडिक यानी पंचनामा करुन श्री.पाटील यांचे नुकसान झाल्याचे सांगितले.
दरम्यान शनिवारी (ता.२६) गणपती नाना पाटील यांंच्या दोन तर पंधरा दिवसापुर्वी सर्जेराव आनंदा जाधव यांंच्याही दोन शेळ्याना मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून वनविभागाने सापळा लावून या प्राण्याला पकडून जंगलात सोडावे अशी मागणी होत आहे.

Web Title: Kolhapur News attack of laughing animal Taras on domestic animals