आधी दिला पेपर...नंतर वडिलांना अग्नी

लुमाकांत नलवडे
गुरुवार, 17 मे 2018

कोल्हापूर - वडिलांची इच्छा होती, तिने बी फार्म करावे. आज तिचा शेवटचा पेपर होता; मात्र रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या वडिलांचे पहाटे निधन झाले. घरात आक्रोश सुरू झाला. मुलगी अस्मितालाही अश्रू अनावर झाले; पण नातेवाईकांनी तिला धीर दिला. ‘तुला वडिलांची इच्छा पूर्ण करायची आहे. तू पेपर दे.’ तिनेही अश्रू पुसले आणि मन घट्ट करून दोन तासांचा पेपर तासात देऊन घरी परतली. सायंकाळी वडिलांच्या अंत्ययात्रेत शितोंडी धरली आणि अग्नीही दिला. सोबत होती तिची लहान बहीण लक्ष्मी.

जवाहरनगरातील अविनाश आनंदराव कदम कोल्हापुरी चप्पल आणि मोजे तयार करणारे उद्योजक. कदम यांना अस्मिता व लक्ष्मी या दोन मुली. मुलीच माझ्या वंशाचा दिवा, असे ते सर्वांना सांगत. अस्मिता बी फार्म व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. गेली काही महिने ते आजारी होते. दोन दिवसांपूर्वींच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. या वेळी पत्नी आणि मुलगी लक्ष्मी रुग्णालयात होती. परीक्षेमुळे अस्मिता घरीच अभ्यास करीत होती. तिला पहाटे वडिलांचे निधन झाल्याचा निरोप मिळाला.

साश्रूनयनांनी रुग्णालयात पोचली. तेथे तिने वडिलांचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला; मात्र अतिदक्षता विभागात अन्य रुग्णांवर तातडीचे उपचार सुरू असल्याने तिला वडिलांचा चेहराही पाहता आला नाही.

सकाळी कुटुंबीयांना रुग्णालयातून घरी पाठविले. घरी आक्रोश सुरू झाला; पण नातेवाईकांनी अस्मिताला धीर दिला. ‘तुला वडिलांची इच्छा पूर्ण करायची आहे, तू आज पेपरला जा, असे सांगून समजूत घातली. तिनेही अश्रू आवरले. मन घट्ट करून पेपर देण्याची तयारी केली. नातेवाईकांसोबत ती पेठवडगावच्या परीक्षा केंद्रावर गेली. दोन तासांचा पेपर ती तासात देऊन 
बाहेर पडली.

अस्मिता घरी पोचली आणि त्यानंतर वडिलांचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणला. डोळे पुसत तिने शितोंडी हाती धरली आणि वडिलांच्या मृतदेहाला अग्नीही दिला. या वेळी तिच्यासोबत लहान बहीण लक्ष्मीही होती. 

परिवर्तनाचा संदेश
शक्‍यतो महिला स्मशानभूमीत येत नाहीत; मात्र अस्मिताने आज वडिलांच्या मृतदेहावर अग्निसंस्कार केले. मुलगा-मुलगी समानता पाळत परिवर्तनाचा संदेश दिला. रक्षाविसर्जन उद्या (ता. १७) सकाळी नऊ वाजता आहे.

Web Title: Kolhapur News Avinash Kadam Death human interest story

टॅग्स