बीएस्सी (ॲग्री) चा पेपर फुटल्याची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

दानोळी - पेपर फुटीच्या संशयाबदल कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन व शिक्षण परिषदेकडे तक्रार केली.

दानोळी - पेपर फुटीच्या संशयाबदल कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन व शिक्षण परिषदेकडे तक्रार केली.

आज बी.एस्सीच्या (ॲग्री) पहिल्या  वर्षाचा एक्‍सटेंशन १२२ हा पेपर होता. दुपारी पेपर सुरू झाल्यानंतर व्हाट्‌सएपवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाली. याची दखल घेत महाविद्यालयाने पुणे येथे कृषी संशोधन परिषदेकडे याबाबत सायंकाळी लेखी तक्रार केली. याबाबत कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. जी. खोत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रार केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
 
Web Title: Kolhapur News B Sc agri Paper leak issue