सामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे सरकार - बाळा नांदगावकर

सचिन सावंत 
सोमवार, 26 मार्च 2018

कोल्हापूर - सामन्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार आंधळे, बहिरे आणि मूके आहे, अशी टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

कोल्हापूर - सामन्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार आंधळे, बहिरे आणि मूके आहे, अशी टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या मजबूत बांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर हे दोन दिवस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यांवर आले आहेत यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

जिल्हा दाैऱ्यावर असणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी मनसेचे स्थानिक पदाधिकारी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. स्थानिक पातळीवर पदाधिऱ्यांंनी गटतट विसरून पक्षाच्या मजबूत बांधणीसाठी एकत्र येण्याची सूचना नांदगावकर यांनी बैठकीत केली. पक्षाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या पदाधिऱ्यांंना घराचा रस्ता दखवला जाईल, असा इशाराही देखील नांदगावकर यांनी दिला. 

भाजप नेते माधव भंडारी यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना नांदगावकर यांनी माधव भंडारी यांनी आधी स्वतःची उंची पहावी. उंची नसणाऱ्यांनी दुसऱ्यावर टीका करू नये, असा सल्ला देखील यावेळी दिला. कोल्हापूरमधून सुरू झालेला दौरा राज्यभर सुरू राहणार आहे. या दौऱ्याचा अहवाल मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांना देण्यात येणार आहे.

Web Title: Kolhapur News Bala Nandgaonkar Press