चला! स्वत:पासून प्लास्टिकमुक्ती करूया...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

कोल्हापूर - प्लास्टिक कॅरी करायला इजी आहे; पण त्याचा वापर मानव, प्राणी आणि पर्यावरणाला किती घातक आहे, हे पटवून देत प्लास्टिकमुक्तीची सुरुवात स्वतःपासून करा... अशी साद  शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागातील शिक्षक, विद्यार्थ्यांनी दिली. निमित्त होतं ऐतिहासिक भवानी मंडपात ‘सकाळ फेसबुक लाईव्ह’शी संवाद साधतानाचं.

प्लास्टिकचे धोके अभ्यासक्रमातून जाणले. मानव, प्राणी आणि पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिक हद्दपार झाले पाहिजे. शासनाने एक पाऊल पुढे टाकत प्लास्टिकबंदी केली. त्याला आम्ही प्रबोधनाची जोड देत आहोत. विघटन न होणाऱ्या प्लास्टिकने मनुष्य, प्राणी, वन्यजीव इतकेच नव्हे तर जलचर प्राण्यांचेही जीवन धोक्‍यात आणले. पर्यावरणासह भावी पिढीचा विचार करा आणि प्लास्टिक मुक्तीसाठी पुढे या. स्वतः पासून कापडी पिशवीचा वापर करा. प्लास्टिकमुक्तीचा संदेश घराघरात पोहचवा, देश ‘प्लास्टिकमुक्त’ होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. 
 
Web Title: Kolhapur News Ban on Plastic issue