बार्बमुळे हिरण्यकेशीतील जैवविविधतेवर ‘प्रकाश’

रणजित कालेकर
शुक्रवार, 29 जून 2018

आजरा - पश्‍चिम घाटातील आंबोली परिसरातील हिरण्यकेशी नदी ही जशी जीवनदायिनी, संस्कृतीची वाहिनी आहे, तशीच ती जैवविविधतेने परिसर समृद्ध करणारी आहे. ही नदी ज्या आंबोली परिसरात उगम पावून ३० किलोमीटरचा प्रवास करून आजरा परिसरात येते, हा संपूर्ण परिसरच अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती, जलचर, प्राणी यांनी वैभवसंपन्न आहे.

आजरा - पश्‍चिम घाटातील आंबोली परिसरातील हिरण्यकेशी नदी ही जशी जीवनदायिनी, संस्कृतीची वाहिनी आहे, तशीच ती जैवविविधतेने परिसर समृद्ध करणारी आहे. ही नदी ज्या आंबोली परिसरात उगम पावून ३० किलोमीटरचा प्रवास करून आजरा परिसरात येते, हा संपूर्ण परिसरच अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती, जलचर, प्राणी यांनी वैभवसंपन्न आहे.

या चार वर्षांत हिरण्यकेशी नदीतील जलचरांच्यावर अभ्यास सुरू झाला असून, नुकताच या नदीत सापडलेल्या ‘प्रकाश बार्ब’ या खवली माशांमुळे या नदीतील जीवसृष्टीवर प्रकाश पडला आहे. या नदीत आढळणाऱ्या माशांच्या विविध प्रजातींचा अभ्यास करण्याबरोबर त्यांच्या आधिवासाचे संरक्षण होण्याची गरज व्यक्त होत आहे. हा परिसरच संशोधकांना खुणावत आहे.

आंबोली, आजरा परिसरातील नदी, ओढे, नाले येथील माशांचा व जलचरांचा अभ्यास तसा कमीच झाला आहे. इथल्या दऱ्याखोऱ्यांतून उगम पावणारे, डोंगर कपाऱ्यांतून वाहणारे झरे, घनदाट जंगलाचे सान्निध्य व भात खाचरामध्ये विस्तारलेले व पुढे हिरण्यकेशी नदीत एकत्र आलेले माशांचे अधिवास यात माशांच्या व जलचरांच्या अनेक जाती नांदत आहेत.

या नदीत आता संशोधनातून ५८ माशांच्या प्रजाती पुढे आल्या आहेत. यामध्ये स्थानिक लोकांना माहीत असलेल्या वळशीवडा, ढेकळा, गोजळा, काटवा, लावणी, ठिगुर, सुबट, तांबर, लाळकी, खडस या प्रजातीची स्थानिक नावांनी ओळख आहे. हे मासे येथील अनेक खवय्यांच्या जेवणातील महत्त्वाचे घटक बनून राहिले आहेत. या नदीच्या काठावर काही गावांत राहणारे बागडी समाजाचा रोजगार मासेमारीवर वर्षांनुवर्ष चालत आला आहे.
सध्या मृग नक्षत्रापासून मुसळधार झडीत नदीच्या पात्रातून ओढ्यानाल्यात झेपावत अंडी घालण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध चढतीला लागलेले मासे सध्या पाहावयास मिळत आहेत. मासे गोळा करण्यासाठी अनेकांची गर्दी नदी व परिसरात होत आहे. या माशांवर संशोधन व त्यांचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. 

हिरण्यकेशी नदीतील माशांच्या काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्या दुर्मीळ बनत आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे आहे.
- संपत देसाई
, निसर्गप्रेमी.

हिरण्यकेशीतील जीवसृष्टी टिकून
उगम ते संगमपर्यंत हिरण्यकेशीचा घटप्रभेला मिळण्याचा शंभर ते सव्वाशे किलोमीटरचा प्रवास आहे. या नदीवर कोणतेही मोठे धरण नाही. त्यामुळे येथे जैवविविधता अजून आबाधित आहे. त्यामुळे संशोधकांना अभ्यासाला संधी व वाव असल्याचे जाणकार सांगतात. 

संबंधीत बातम्या - 

Web Title: Kolhapur News barb highlights biodiversity in Hiranyakeshi