कर्नाटकच्या निकालावर कोल्हापुरात ५१ हजारांची पैज!

निवास चौगले
रविवार, 13 मे 2018

कोल्हापूर - लोकसभेची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक निकालाची कमालीची उत्सुकता लागून राहीली आहे. काल या निवडणुकीसाठी मतदान कर्नाटकात झाले पण त्याच्या निकालावर कोल्हापुरात तब्बल 51 हजार रूपयांची पैज दोन कार्यकर्त्यांनी लावली आहे.

कोल्हापूर - लोकसभेची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक निकालाची कमालीची उत्सुकता लागून राहीली आहे. काल या निवडणुकीसाठी मतदान कर्नाटकात झाले पण त्याच्या निकालावर कोल्हापुरात तब्बल 51 हजार रूपयांची पैज दोन कार्यकर्त्यांनी लावली आहे.
 
माणगांव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील राजू मगदूम व नेमिनाथ मगदूम या दोन कार्यकर्त्यांत ही पैज लागली आहे. राजू हे कॉंग्रेसचे तर नेमिनाथ हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. कर्नाटकात जर कॉंग्रेसचे आमदार भाजपपेक्षा जास्त निवडून आले तर नेमिनाथ यांनी राजू यांना 51 हजार रूपये रोख द्यायचे तर भाजपाचे आमदार जास्त निवडून आले तर राजू यांनी नेमिनाथ यांना 51 हजार रूपये द्यायचे आहेत. 

गावांतील वैष्णवी मंदीरात ही पैज लागली. एका कागदावर तसा मजकूर लिहण्यात आला. त्यावर या दोघांसह साक्षीदार म्हणून सात जणांच्या सह्याही घेण्यात आल्या. ज्या मंदीरात ही पैज लागली व तसा कागदोपत्री ठराव झाला, त्या मंदीराचे बांधकाम सुरू आहे. पैज कोणीही जिंकली तरी मिळणारे पैसे हे या मंदीराच्या कामासाठी देण्याचेही यावेळी ठरले आहे. तसाही उल्लेख कागदावर आहे. 

राजकीय कार्यकर्त्यांत किती चुरस असते यांचे प्रत्यंत्तर या पैजेतून दिसत आहे. सीमा भाग सोडला तर तसा कोल्हापुरचा कर्नाटकशी फारसा संबंध येत नाही, पण कर्नाटकच्या विधानसभा निकालावर लावलेल्या या पैजेमुळे मात्र कोल्हापूर-कर्नाटक "कनेक्‍शन' अधोरेखित झाले. राजकीय पक्षात जशी या निकालाबाबत उत्सुकता आहे, तशीच उत्सुकता पक्षाच्या दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांतही असल्याचे या पैजेवरून दिसून आले.

कर्नाटकमध्ये काल चुरशीने मतदान झाले. मतदानोत्तर चाचण्यांतही स्पष्ट असा कल दिसू आलेला नाही. काही वाहिन्यांच्या चाचण्यांत काॅग्रेस तर काहींकडे भाजप आघाडीवर राहणार असल्याचा कौल सांगण्यात आला. त्यामुळे निलाक नक्की काय लागणार, याची देशासह माणगावांतही जास्त उत्सुकता आहे. 

Web Title: Kolhapur News bet-rs-51000-karantak-election