पन्हाळ्यावर आढळला रुपेरी कोतवाल पक्षी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

कोल्हापूर - पन्हाळ्यावरील पुसाटी बुरुजाच्या परिसरात रुपेरी कोतवाल (हेअर क्रिस्टेड ड्रोंगो, स्पॅनग्लॅड ड्रोंगो) दिलीप पाटील, डॉ. मोहन धर्माधिकारी व अमित कारंडे यांना आढळला. राधानगरी व तिलारीच्या जंगलात आढळणारा हा पक्षी पन्हाळ्यावर प्रथमच आढळल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

श्री. पाटील हे डॉ. धर्माधिकारी व श्री. कारंडे यांच्यासमवेत पन्हाळ्यावर छायाचित्रे टिपण्यास गेले असता हा पक्षी आढळला. रुपेरी कोतवाल किंवा केसराज कोतवाल या नावाने तो ओळखला जातो. त्याला केसासारखा तुरा असतो. तसेच रुंद शेपटीची टोके वर वळलेली असतात. डोक्‍यावर केसासारखी दिसणारी लांब पिसे चोचीच्या मुळातून आलेली असतात. ही पिसे सहजपणे 
दिसून येत नाहीत. 

पूर्व हिमालयाचा पायथा, उत्तर-पूर्व म्यानवार व ओडिशा, मध्य प्रदेश व पश्‍चिम घाटात तो आढळतो. हा ऋतुमानाप्रमाणे स्थलांतर करतो. उत्तर भारतात एप्रिल ते जून व दक्षिण भारतात मार्च ते एप्रिलदरम्यान त्याचा विणीचा हंगाम असतो असे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Kolhapur News black drongo found in Panhala