चित्रपटाच्या नावाखाली मुलींची विक्रीचा प्रयत्न

राजेश मोरे
गुरुवार, 22 जून 2017

कोल्हापूर : चित्रपटामध्ये अभिनेत्री करतो असे सांगून दुबई, मलेशिया अशा ठिकाणी मुलींची विक्री करणाऱ्या 'मूर्ती' नावाच्या व्यक्तीला आज (गुरुवार) अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, मूर्ती नावाची व्यक्ती शहरातील विविध डान्स क्लासेस मधून काही ठराविक मुली निवडून कावळा नाका (ताराराणी चौक) परिसरातील एका आलिशान हॉटेल मध्ये ऑडिशन घेत असताना मुलींना खासगी आणि अधिक लज्जास्पद प्रश्न विचारात होता. या बरोबर तुमचे बोल्ड फोटो शूट करावे लागेल तसेच दुबई व इतर देशात तुम्हाला जवे लागेल, असे सांगत असे.

या बाबतची माहिती चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच तोतया प्रोड्युसर मुलीची विक्री करणार असल्याच्या संशयातून अमोल कोळेकर, धनाजी यमकर, मिलिंद अष्टेकर, बाळ जाधव व शुभांगी साळूंखे यांनी या मूर्तीला चांगलाच चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले. संबंधित तोतया निर्मात्यावर पुणे तसेच बेंगलोर या ठिकाणी गुन्हे नोंद असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे.

Web Title: kolhapur news bogus producer arrested