कोल्हापूरात दहा कोटींच्या वसुलीला ‘ब्रेक’

विकास कांबळे
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

कोल्हापूर -  ‘एलबीटी’ वसुलीसाठी मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने कोल्हापूर महापालिकेच्या व्यापाऱ्यांकडे असणाऱ्या दहा कोटींच्या वसुलीला ‘ब्रेक’ लागला. त्यामुळे महापालिकेची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशी होणार आहे.

कोल्हापूर -  ‘एलबीटी’ वसुलीसाठी मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने कोल्हापूर महापालिकेच्या व्यापाऱ्यांकडे असणाऱ्या दहा कोटींच्या वसुलीला ‘ब्रेक’ लागला. त्यामुळे महापालिकेची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशी होणार आहे.

दरम्यान, वसुली थांबली असली तरी व्यापाऱ्यांच्या फायली तयार करून ठेवण्याचे काम सुरू राहील. त्यासाठी कॅम्प लावण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

जकात रद्द करून ‘एलबीटी’ सुरू झाल्यानंतर स्वतंत्र विभाग सुरू केला. स्वतंत्रपणे १२५ कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली होती. एलबीटी रद्द झाल्यानंतर काही दिवसांतच १०० कर्मचारी अन्य विभागाकडे वर्ग केले. उर्वरित कर्मचारी अन्यत्र वर्ग करून हा विभाग बंद करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.

पालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या जकात विभागाचे एलबीटी विभागात रूपांतर झाले. ‘एलबीटी’ला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध होता. त्याच्या विरोधातील आंदोलन फार काळ चालले. तरीही पालिकेने वसुली सुरूच ठेवली. मार्च जवळ आल्याने महापालिकेतर्फे सर्वच विभागांची वसुली मोहीम तीव्र करण्याचे आदेश आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.

वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे सर्वच विभागांच्या 
वसुलीला गती आली होती. त्याला ‘एलबीटी’चा विभागही अपवाद नव्हता. शासनाने ‘एलबीटी’ही बंद केला, आणि ‘जीएसटी’ लागू केला. ‘जीएसटी’ लागू केला असला तरी व्यापाऱ्यांकडे थकीत असलेल्या ‘एलबीटी’ वसुलीचे काम सुरूच होते. त्यासाठी सीए नियुक्‍त करण्यात आले आहेत. ‘

जीएसटी’ लागू झाल्याच्या दिवशी कोणत्या व्यापाऱ्यांकडे किती ‘एलबीटी’ची रक्‍कम थकीत आहे, याचा आकडा निश्‍चित करण्यात आला. या कालावधीतील २० कोटी रुपये व्यापाऱ्यांकडे थकीत होते. त्यापैकी दहा कोटी वसूल झाले आहेत. दहा कोटी शिल्लक आहेत. त्याच्या वसुलीचे नियोजन सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी एलबीटी वसुलीला स्थगिती दिली. त्यामुळे साधारणपणे सहा हजार व्यापाऱ्यांकडे असणाऱ्या दहा कोटींच्या वसुलीत अडथळा निर्माण झाला आहे.

Web Title: Kolhapur News Break to collection of LBT