शेतकरी,सहकार टिकला तरच देश टिकला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

कोल्हापूर - शेतकरी टिकला तरच सहकार आणि देशही टिकेल,असे मत कृषीभूषण डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले. कोल्हापुरला सहकाराचा मोठा वारसा असून शेतकरी संघाचा यापूर्वीचा लौकिक कायम ठेवण्यासाठी संचालक व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले. 

शेतकरी संघाचे संस्थापक तात्यासाहेब मोहिते यांच्या 58 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. मुळीक बोलत होते. शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील होते. 

डॉ. मुळीक म्हणाले,"आशिया खंडात नावाजलेल्या या संघाची पायाभरणी तात्यासाहेब मोहिते यांनी केली. सभासदांचा अजूनही संघावर विश्‍वास आहे. कोणतीही वस्तू खरेदी करायची तर ती संघातच अशी ओळख होती. दाणेदार मिश्र खत, रॉकेल एजन्सी,औषध दुकान या माध्यमातून ग्रामीण जनतेच्या मनामनात संघ पोचला आहे.' 

ते म्हणाले,"खुली अर्थव्यवस्था, जागतिकिकरण यामुळे सहकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सहकारात काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सामान्य माणसाच्या हितासाठी केलेली गुंतवणूक म्हणजे सहकार आहे, म्हणून या क्षेत्रात काम करणाऱ्यांची जबाबदारीही वाढली आहे,त्यांनी पुढाकार घेऊन हा सहकार टिकवला पाहिजे. त्यासाठी शेतकरी व शेतमालाचे सरंक्षण करणे महत्वाचे आहे. अन्न, पाणी, हवा म्हणजे शेतकरी आहे, पण तोच सद्या अडचणीत आहे.शेतमालाला योग्य किंमत मिळाली तरच हा शेतकरी टिकेल. अन्यथा त्याच्यासह सहकारही नामशेष होईल. म्हणून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतीसाठी स्वतंत्र कायदा, शेतीपूरक व्यवासायांचीही कर्जमाफी झाली पाहिजे.' 

प्रास्ताविक भाषणात युवराज पाटील म्हणाले,"तात्यासाहेब मोहिते यांच्या दुरदृष्टीमुळे संघाची भरभराटी झाली. यावर्षी संघाला एक कोटी रूपयांचा नफा झाला आहे. 65 शाखा कार्यरत असून खत कारखानाही चांगल्या पध्दतीने सुरू आहे. पुढील वर्षी दोन कोटी रूपये नफा मिळवण्याचे उद्दीष्ट आहे.' 

या कार्यक्रमात संघात सलग 25 वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा डॉ. मुळीक यांच्या हस्ते सत्कार झाला.उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संचालक विनोद पाटील,अमरसिंह माने, विजयादेवी राणे, सुमित्रादेवी शिंदे, जी. डी. पाटील, अण्णाप्पा चौगले, विजयकुमार चौगुले, बाळकृष्ण भोपळे, व्यंकाप्पा भोसले, व्यवस्थापक आप्पासो निर्मळे आदी उपस्थित होते. 

Web Title: kolhapur news budhajirao mulik