बायपास सर्जरी होऊनही गळ्यापर्यंत पाण्यात उतरून ड्रेनेज सफाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

कोल्हापूर  - महापालिकेचे कर्मचारी म्हणजे कामचुकार, अशी प्रतिमा पुसून टाकण्याचे काम झाडू कामगार दयानंद हेगडे यांनी काल (ता. 19) केले. बायपास सर्जरी होऊनही शाहुपुरी पोलिस ठाण्यासमोरच्या खोल गटारात उतरून नाला साफ करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या कामाचे कौतुक आज सर्वसाधारण सभेत सत्काराच्या रूपाने झाले. महापौर हसीना फरास यांनी दयानंद यांचे काम स्वतः पाहिले होते. त्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी या अभिनव सत्काराचे आयोजन केले. 

महापालिकेत अनेक कामचुकार सफाई कामगार आहेत. आजारी नसतानाही आजारपणाचे सोंग घेउन नगरसेवक,पदाधिकाऱ्याचा वशिला लाउन ऑफीसमधली कामे अनेक कर्मचाऱ्यांनी पटकावली आहेत. धडधाकट असूनही घाणीतली कामे टाळण्याचे काम कांही कर्मचारी करतात. पण बायपाससारखी सर्जरी होउनही स्वताच्या जीवाची पर्वा न करता गटारी साफ करणारे दयानंद हेगडे यांच्यासारखे कर्मचारी चांगल्या कामाची पोचपावती देणारे नक्कीच आहेत. तुंबलेली गटार खुली करणारा झाडू कामगारही महापालिकेची प्रतिमा उंचावू शकतो, हेच यानिमित्ताने हेगडे यांनी दाखवून दिले आहे. 

कालच्या पावसाने शाहुपुरी पोलिस ठाण्याच्या परिसरालाही तळ्याचे स्वरूप आले होते. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोन खणखणू लागले. शाहुपुरी पोलिस ठाण्याजवळ कमरेएवढे पाणी होते. त्या लगतच्या चॅनलमध्ये गळ्याएवढे पाणी तुंबले होते. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, थर्माकॉल चॅनलमध्ये अडकल्याने पाणी तुंबले होते. चॅनल खुले करण्यासाठी दयानंद चॅनलमध्ये उतरले. त्या वेळी त्यांच्या गळ्याला लागत होते. तशा स्थितीतही त्यांनी गटार स्वच्छ केले. इतर कर्मचारी दयानंद यांच्या तुलनेत धडधाकटच होते. त्यांची मात्र वर्षापूर्वी बायपास सर्जरी झाली आहे. अशा अवस्थेतही पाण्यात उतरून कर्तव्य बजावताना दयानंद जराही कचरले नाहीत. दयानंद यांची बायपास सर्जरी झाल्याचे महापौर फरास यांच्या लक्षात येतात त्यांनी त्यांना पाण्यातून बाहेर येण्यास सांगितले. आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे यांनीही त्यांना बाहेर येण्याची सूचना केली. इतर कर्मचाऱ्यांना उर्वरित कामासाठी नाल्यात उतरविले; पण दयानंद यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे महापौर फरास याही भारावून गेल्या. त्यांनी दयानंद हेगडे यांचा आज हा आगळावेगळा सत्कार केला. तसेच, व्हीनस कॉर्नर येथील चेंबर शोधून या चॅनल साफ करण्याचे काम करणाऱ्या मिलिंद चौगुले याचाही सत्कार झाला. 

Web Title: kolhapur news bypass surgery KMC