दरडोई उत्पन्न ११ हजाराने वाढले

सुनील पाटील
सोमवार, 16 एप्रिल 2018

कोल्हापूर - कृषी उत्पादनासह इतर उद्योगांत कोल्हापूरने बाजी मारली. कोल्हापूरच्या दरडोई उत्पन्नात तब्बल ११ हजार ६४५ रुपयांनी वाढ झाल्याचे राज्याच्या यंदाच्या आर्थिक पाहणीत स्पष्ट झाले. गेल्या आर्थिक वर्षाच्या आर्थिक पाहणीत (२०१६-१७) कोल्हापूरचे १ लाख ३९ हजार २८६ रुपये असणारे दरडोई उत्पन्न यावर्षी १ लाख ६७ हजार ३०३ झाले आहे.

कोल्हापूर - कृषी उत्पादनासह इतर उद्योगांत कोल्हापूरने बाजी मारली. कोल्हापूरच्या दरडोई उत्पन्नात तब्बल ११ हजार ६४५ रुपयांनी वाढ झाल्याचे राज्याच्या यंदाच्या आर्थिक पाहणीत स्पष्ट झाले. गेल्या आर्थिक वर्षाच्या आर्थिक पाहणीत (२०१६-१७) कोल्हापूरचे १ लाख ३९ हजार २८६ रुपये असणारे दरडोई उत्पन्न यावर्षी १ लाख ६७ हजार ३०३ झाले आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांत उसाला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या हातात काही रक्कम शिल्लक राहत आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठे उत्पादन उसाचे आहे. या पार्श्‍वभूमीवर ऊस हा दरडोई उत्पन्न वाढीतील मोठा घटक आहे. 

गेल्या वर्षी (२०१६-१७) प्रतिटन उसाला सरासरी २६०० ते २८०० दर मिळाला. याचा फायदा जिल्ह्यातील ५ लाखांहून अधिक ऊस उत्पादकांना झाला. राज्यातील एकूण उत्पादनात १७.९ टक्के हिस्सा कृषीचा आहे. कृषी व कृषीवर आधारित व्यवसायाचा आहे. हा हिस्सा प्रत्येक वर्षी सरासरी २.५ ते २.६ टक्‍क्‍याने वाढत आहे. याशिवाय उद्योग क्षेत्राचा हिस्सा ३०.४ टक्के असून, यात वर्षाला ५ टक्‍क्‍यांची वाढ होत आहे. सर्वाधिक उत्पन्न हे म्हणजे ५१ टक्के हिस्सा हा सेवा क्षेत्राचा आहे.

कोल्हापुरात मात्र कृषी आणि उद्योगातील उत्पन्न सर्वाधिक आहे. कोल्हापूरच्या दरडोई उत्पन्नात ऊस, दुग्ध व्यवसायासह इतर कृषीवर आधारित उत्पादनाचा मोठा वाटा आहे. नोटाबंदीआधी उद्योगातही चांगली स्थिती होती. आलेल्या संकटातून उद्योगानेही मुसंडी मारली आहे. 

कृषी व कृषी संलग्न व्यवसायामुळे राज्यातील उत्पादनात मोठी वाढ झाली. २०११-१२ मध्ये राज्यात कृषी व कृषी संलग्न क्षेत्रातले १५ लाख १ हजार ८४८ कोटी उत्पन्न होते. सहा वर्षांत वाढ होऊन हेच उत्पन्न १७ लाख १६ हजार ७४६ कोटींपर्यंत गेले. याचा कोल्हापुरातील दरडोई उत्पन्न वाढीवर चांगला परिणाम झाला. 

(राज्याच्या आर्थिक पाहणी (२०१७-१८) मधील
कोल्हापूरचे ६ वर्षांपासूनचे दरडोई उत्पन्न)  

वर्ष    दरडोई उत्पन्न
२०११-१२    १ लाख ४ हजार ४५८
२०१२-१३    १ लाख १७ हजार ५५४
२०१३-१४    १ लाख २८ हजार ९६५
२०१४-१५    १ लाख ३९ हजार २८६
२०१५-१६    १ लाख ५१ हजार ६५४
२०१६-१७    १ लाख ६७ हजार ३०३
 

 

Web Title: Kolhapur News Per capita income increased by 11 thousand