यंदा पॉलिटेक्‍निकला ‘कॅरीऑन’

दीपक कुपन्नावर
बुधवार, 20 जून 2018

गडहिंग्लज - गतवर्षी तंत्रनिकेतनसाठी (पॉलिटेक्‍निक) नवा अभ्यासक्रम (आय स्कीम) सुरू झाला. परिणामी जुन्या अभ्यासक्रमाच्या (जी स्कीम) विद्यार्थ्यांना पॉलिटेक्‍निक उत्तीर्णसाठी शेवटची (वनटाईम अपॉर्च्युनिटी) संधी देण्याचे राज्य तंत्रशिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. 

गडहिंग्लज - गतवर्षी तंत्रनिकेतनसाठी (पॉलिटेक्‍निक) नवा अभ्यासक्रम (आय स्कीम) सुरू झाला. परिणामी जुन्या अभ्यासक्रमाच्या (जी स्कीम) विद्यार्थ्यांना पॉलिटेक्‍निक उत्तीर्णसाठी शेवटची (वनटाईम अपॉर्च्युनिटी) संधी देण्याचे राज्य तंत्रशिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. 

यामुळे द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण राज्यातील ४० हजार तर 
जिल्ह्यातील २ हजार ५०० विद्यार्थ्यांना थेट तृतीय वर्षात प्रवेश मिळणार आहे. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयातर्फे शंभर रुपयांच्या शुल्कासह हमीपत्र भरून अर्ज ३० जूनअखेर सादर करावयाचा आहे. 

राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पॉलिटेक्‍निक अभ्यासक्रम राबविला जातो. तीन वर्षाच्या कोर्ससाठी गतवर्षीपासून ‘आय स्कीम’ हा नवा अभ्यासक्रम सुरू केला. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, कॉम्प्युटर, केमिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, टेक्‍स्टाईल या प्रमुख आठ अभ्यासक्रमांतर्गत २९ कोर्सेसना हा अभ्यासक्रम राबविला जात आहे. त्यामुळे जुन्या स्कीम अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना यंदा तृतीय वर्षाची परीक्षा देण्यासाठी कॅरीऑन देण्याचा निर्णय मंडळाने जाहीर केला आहे. ही संधी विद्यार्थ्याचे सत्र पूर्ण करून घेण्यासाठी दिल्याचे मंडळातर्फे स्पष्ट केले आहे. 

येणाऱ्या हिवाळी परिक्षा २०१८ मध्ये मागील सत्राच्या अनुत्तीर्ण विषयात जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील. त्यांनाच उन्हाळी परिक्षा २०१९च्या पाचव्या आणि सहाव्या सत्राची परीक्षा देता येईल. कॅरीऑनमुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून संस्थेने वेगळा वर्ग करून शैक्षणिक कामकाज पूर्ण करण्याची सूचना मंडळाने केली आहे. तसेच या संधी अंतर्गत विषयांचे केलेले टर्मवर्क, जर्नल, ड्रॉईंग आदी जतन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असल्याचे मंडळाने म्हंटले आहे. परीक्षेस पात्र झाल्यावर अशा विद्यार्थ्यांनी वरील सर्व साहित्य सादर करण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची राहणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी आपापल्या तंत्रनिकेतनाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबईचे सचिव वि. र. जाधव यांनी पत्रातून केले आहे. 

हे विद्यार्थी पात्र 
कॅरीऑन या योजनेसाठी प्रथम वर्ष अनुत्तीर्ण असला तरी द्वितीय वर्षातील परीक्षा दिलेला विद्यार्थी पात्र आहे. प्रथम आणि द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना यामुळे थेट तृतीय वर्षातील पाचवे आणि सहावे सत्र पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

  • ४६० - राज्यातील एकूण पॉलिटेक्‍निक
  • १,५२,९२० - विद्यार्थी प्रवेश क्षमता
  • ४८ - शासकीय पॉलिटेक्‍निक
  • १८  - अनुदानित पॉलिटेक्‍निक
Web Title: Kolhapur News carrion in Polytechnic