धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - प्रतिभानगरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण दोघा चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. राजारामपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली. याबाबतची फिर्याद दक्षा योगेश शहा (वय 56, रा. पद्मा टॉकीज चौक परिसर, लक्ष्मीपुरी) यांनी दिल आहे. 

कोल्हापूर - प्रतिभानगरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण दोघा चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. राजारामपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली. याबाबतची फिर्याद दक्षा योगेश शहा (वय 56, रा. पद्मा टॉकीज चौक परिसर, लक्ष्मीपुरी) यांनी दिल आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः दक्षा शहा लक्ष्मीपुरी पद्मा चौक परिसरात राहतात. आज सकाळी त्या मैत्रिणींसोबत प्रतिभानगर येथील जैन मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. धार्मिक कार्यक्रमानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या दोघी मैत्रिणींसोबत मंदिरातून बाहेर पडल्या. रिक्षा थांब्यापर्यंत त्या चालत जात होत्या. दरम्यान, रस्त्यावर एक तरुण मोटारसायकल सुरू करून उभा होता. त्याच्या शेजारी त्याचा साथीदार त्याच्याशी बोलत उभा होता. शहा या त्यांच्या समोरून रिक्षा थांब्याच्या दिशेने जात होत्या. तेवढ्यात मोटारसायकलजवळ उभा असणाऱ्या तरुणाने त्यांच्या पाठीमागून गळ्यातील पाच तोळ्याचे अंदाजे दीड लाख रुपये किमतीचे गंठण हिसडा मारून काढून घेतले. क्षणात तो मागे फिरला आणि साथीदाराच्या मोटारसायकलवर बसून पसार झाला. अवघ्या काही क्षणात घडलेल्या या प्रकारामुळे शहा व त्यांच्या मैत्रिणी घाबरल्या. त्यांनी आरडाओरडा केला. रस्त्यावर जास्त वर्दळ नसल्याने नागरिकही जमा होण्यास वेळ लागला. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ते सापडले नाहीत. यानंतर सायंकाळी शहा यांनी याबाबतची फिर्याद राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली. एका चोरट्याने निळे जॅकेट परिधान केले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. शहर परिसरात चेन स्नॅचिंगचे प्रकार वारंवार घडत आहेत. आज भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे महिला वर्गात घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांनी उपनगरात दिवसाचीही गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. 

Web Title: kolhapur news chain snatcher

टॅग्स