शिकाऱ्यांपासून मोरांच्या संरक्षणाचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

राष्ट्रीय पक्षी संकटात - पिसे, चरबीसाठी होतेय राजरोस शिकार

कोल्हापूर - शाहूवाडी, जोतिबा, पन्हाळा, कुशिरेसह शिवाजी विद्यापीठात मोरांचे अस्तित्व असून, अट्टल शिकाऱ्यांकडून त्यांचे संरक्षण करणे हे आव्हान बनले आहे. मोरांच्या पिसांना असलेले मार्केट व सांधेदुखीसाठी उपयुक्त चरबीमुळे त्यांची राजरोस शिकार होऊ लागली आहे. राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरांची विद्यापीठात सुमारे एक हजारांवर संख्या आहे. मात्र, बंदिस्त कुंपणाअभावी त्यांची संख्या घटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भारतीय संस्कृतीत मोराला सर्वोच्च स्थान आहे. त्याची १९६३ला देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषणा झाली. कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांशी सर्वच तालुक्‍यात त्याचे अस्तित्व दिसते. मात्र, शाहूवाडी, जोतिबा, पन्हाळा, कुशिरे व विद्यापीठ परिसरात त्याच्या झुंडी पाहायला मिळतात. कुशिरेच्या डोंगरावरील झाडांवर पाच ते सहा वर्षांपूर्वी हा पक्षी पाहायला मिळायचा. मात्र, चोरट्या शिकारीने त्याची घटलेली संख्या चिंताजनक आहे. रात्रीच्या वेळी छरे मारून अथवा जाळे टाकून त्यांची शिकार केली जात असल्याचे प्रकार आजही सुरूच आहेत. शिकारी कुत्र्यांद्वारे मोरांची शिकार केली जात आहे.
 
Web Title: kolhapur news Challenge of protecting peacocks from hunters