शाहू जन्मस्थळ उर्वरित कामाच्या नियोजनासाठी उद्या बैठक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

कसबा बावडा - शाहू महाराज जन्मस्थळाचे सुशोभिकरण अत्यंत चांगल्या पद्धतीने झाले असून उर्वरित संग्रहालयाच्या बांधकामासाठी 13 कोटी रुपयांचा निधी घोषित केला आहे. त्यापैकी दोन कोटी रुपये मिळाले असून त्या कामाच्या नियोजनासाठी 28 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधीतांची बैठक आयोजित केली आहे, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. शाहू जयंतीनिमित्त "लक्ष्मी विलास पॅलेस' येथे राजर्षी शाहूंना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. 

मंत्री पाटील म्हणाले, ""जसजशी कामे पूर्ण होतील, तसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. घोषित सर्व निधी निश्‍चित या ठिकाणी वापरला जाईल.'' 

शाहू जन्मस्थळ विकास समितीच्या सदस्यानी अनेक सूचना मांडल्या. 28 जूनच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभेत मागील झालेल्या कामांचा आढावा, पुढील कोणती कामे करायची तसचे समिती सदस्यांच्या सूचनांचा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. 

या वेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, कुलगुरू देवानंद शिंदे, महापौर हसीना फरास, आमदार सतेज पाटील, अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी, अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, पीडीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, जेष्ठ विचारवंत जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, स्थायी सभापती सभापती डॉ. संदीप नेजदार, संदीप देसाई, दिलीप देसाई, मराठा क्रांती मोर्चाचे जयेश कदम, राजेश लिंग्रज यांच्यासह शाहूप्रेमी बावड्यातील नागरिक उपस्थित होते. 

Web Title: kolhapur news chandrakant dada patil shahu maharaj