पालापाचोळ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प लवकरच कोल्हापूरात - चंद्रकांत पाटील

संदीप खांडेकर
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

कोल्हापूर - शेतातील पालापाचोळ्या पासून वीज निर्मितीचा पाचशे कोटी रुपयांचा प्रकल्प कोल्हापुरात सुरू करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले.

कोल्हापूर - शेतातील पालापाचोळ्या पासून वीज निर्मितीचा पाचशे कोटी रुपयांचा प्रकल्प कोल्हापुरात सुरू करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले.

कमला महाविद्यालयात रुफ टाॅप सोलर सिस्टिमच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते सिस्टीमचे उद्घाटन झाले. व्ही. टी. पाटील सभागृहात कार्यक्रम झाला.

श्री. पाटील म्हणाले, "शेतातील पालापाचोळ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रात एकाच ठिकाणी देण्यात येणार आहे. तो कोल्हापुरात सुरू करण्यासाठी जागेची पाहणी सुरू आहे. भविष्यात गावातले वेस्टेज वीज निर्मितीसाठी उपयोगात आणले जाणार आहे. तसेच गायी केवळ दूधासाठी नव्हे तर गोमूत्रातील अर्क  मिळवण्याकरिता अनेक जण गायी पाळतील."

Web Title: Kolhapur News Chandrakant Patil comment