ब्रॅंच नव्हे, मी रिझर्व्ह बॅंकच... - मंत्री चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

नूल - जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणण्यात मी रिझर्व्ह बॅंकेची ब्रॅंच नव्हे, तर रिझर्व्ह बॅंकच आहे, असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथील एका कार्यक्रमात केले.

नूल - जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणण्यात मी रिझर्व्ह बॅंकेची ब्रॅंच नव्हे, तर रिझर्व्ह बॅंकच आहे, असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथील एका कार्यक्रमात केले.

नूल येथील कार्यक्रमात एका वक्‍त्याने मंत्री श्री. पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी चार हजार कोटींचा निधी आणल्याचा व त्याबाबत विरोधकांकडून होणाऱ्या आरोपाचा उल्लेख केला. त्याचा धागा पकडत पालकमंत्री श्री. पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्यावर पलटवार केला. 

ते म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याकडील वस्तू विकून सामाजिक काम उभे केले. मुश्रीफ व सतेज पाटील यांना कदाचित ते कळत नसेल. लोकांच्या जमिनी घेऊन स्वत:च्या संस्था कशा उभारायच्या हेच त्यांना चांगले माहीत आहे. ’’ 

विद्यार्थ्यांसाठी नवी योजना
यावेळी विनोद तावडे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या घरातील कर्त्या पुरुषाचा अपघात होतो. कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न तयार होतो. काही विद्यार्थ्यांचाही अपघात होतो. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून दहा रुपये भरून घेऊन विमा उतरवला जाईल.’’

मिरवणुकीस आठ हत्ती लागतील
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘पाचशे कोटी निधी आणल्यास पालकमंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे विरोधकांनी जाहीर केले होते. जिल्ह्याच्या विकासासाठी चार हजार कोटी आणले आहेत. आता विरोधकांना आठ हत्ती आणावे लागणार, परंतु त्या सर्वांवर मी एकटाच कसा बसणार?’’

Web Title: Kolhapur News Chandrakant Patil comment